आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्सचा ५६ वर्षीय अल्ट्रा ट्रायथलिट पास्कल पिच अल्ट्रा ट्रायथलॉनमध्ये पाच वेळा जागतिक विजेता बनला आहे. अल्ट्रा ट्रायथलॉनमध्ये खेळाडूंना ३.८ किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग आणि एक मॅरेथॉन पूर्ण करावी लागते. कोरोना व्हायरसदरम्यान तो एका दुसऱ्या मोहिमेवर आहे. तो आपल्या १४ बाय १४ च्या छोट्या खोलीत स्टेशनरी बाइकवर सायकलिंग करत आहे. तो ८ हजार किमी सायकलिंग करेल. त्याचा उद्देश देशातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जीवन सुखद करणे आहे. तो त्याच्या मदतीसाठी निधी जमा करतोय. पिचने एक वेळा टूर डी फ्रान्सच्या मार्गावर ८ दिवस व ८ रात्र सायकलिंग केली होती. टूर डी फ्रान्स ३५०० किमीची सायकलिंग शर्यत आहे. यंदा तो साऊथ फ्रान्सच्या कम्यून सेविगनेरगसमध्ये घराबाहेर न जाता सायकलिंग करतोय. पिच प्रत्येक दिवशी सायकलिंगदरम्यान सोशल मीडियावर लाइव्ह असतो. त्याला जितके लाइक्स मिळतात, त्यानुसार प्रायोजक त्याला पैसे देतील. या निधीतून तो आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी साहित्य, कॉफी मशीन, टेबल-टेनिस, मायक्रोवेव्ह आदी खरेदी करेल. “१०० मशीन्स २८ वेगवेगळ्या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जेव्हा फ्रान्समध्ये अधिकृत लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा मी आघाडीच्या कर्मचाऱ्यांसाठी मदत करू इच्छित होतो. सर्व जण आपापल्या पद्धतीने मदत करू शकतात. मी ते करतोय, जे करू इच्छितो,’असे ताे म्हणताे.
एका आठवड्याची रिकव्हरीदेखील केली होती :
पिचने ८ हजार किमी पैकी ३४७१ किमी सायकलिंग केली आहे. त्याने रिकव्हरीसाठी एका आठवड्याची विश्रांतीदेखील घेतली होती. आता पुन्हा त्याने स्टेशनरी बाइकवर सायकलिंग सुरू केली आहे. त्याने ६ दिवसांत आणखी ५४ किमी सायकलिंग केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.