आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत चॅम्पियन फ्रान्स संघ आता फिफाच्या विश्वचषकावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे फाॅर्मात असलेल्या किलियन एमबापेच्या फ्रान्स संघाने दुसऱ्यांदा जग्गजेता हाेण्यासठी कंबर कसली आहे. यंदाच्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत फ्रान्स आणि माेराेक्काे आज बुधवारी मध्यरात्री समाेरासमाेर असतील. सध्या चमत्कारिक खेळीने आफ्रिकन फुटबाॅल संघ माेराेक्काेने आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे फ्रान्स संघाला सावध खेळी करावी लागणार आहे. यादरम्यान फ्रान्स शैलीदार आक्रमणातून माेराेक्काेचा मजबूत डिफेन्स भेदण्यासाठी उत्सुक आहे. फ्रान्स संघाने उपांत्यपूर्व फेरीत हॅरी केनच्या इंग्लंडचा पराभव केला. यासह टीमला उपांत्य फेरीचा पल्ला गाठता आला. त्यामुळे आता फ्रान्स संघाची नजर चाैथ्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठण्यावर लागली आहे. फ्रान्सने आक्रमक खेळीतून यंदाच्या विश्वचषकात प्रतिस्पर्धीच्या डिफेन्सला भेदून ११ गाेल केले आहेत.
प्लेयर टू वॉच अँटाेनी ग्रीजमॅन व एमबापे विजयात याेगदान देत आहेत. आताही या दाेघांवर संघाच्या विजयाची मदार असेल. ग्रीजमॅनने गाेलच्या १७ संधी मिळवून दिल्या. तसेच ३ असिस्टही केले आहेत.
स्ट्रेटजी कॉर्नर {फ्रान्सचे ४-२-३-१ फाॅर्मेशनने ५ सामन्यात ४ विजय. याच्या बळावर उपांत्य फेरीत विजयचा मानस आहे. {माेराेक्काेने यंदा एकही सामना गमावला नाही. आताही संघ ४-३-३ फाॅर्मेशनला कायम ठेवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.