आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Augusta Masters Have Wimbledon like Practices; Old Tradition Of Sending Invitations, Players Also Answer, Alan Blinder

दिव्य मराठी विशेष:ऑगस्टा मास्टर्समध्ये विम्बल्डनसारख्या आहेत प्रथा; निमंत्रण पाठवण्याची जुनी परंपरा, खेळाडूही उत्तरे देतात, अॅलन ब्लाइंडर

ऑगस्टा (जॉर्जिया)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्फच्या प्रमुख स्पर्धांपैकी एक ऑगस्टा मास्टर्स गुरुवारपासून सुरू होणार आहे. ही एकमेव गोल्फ स्पर्धा आहे, जी नेहमी एकाच ठिकाणी (ऑगस्टा नॅशनल गोल्फ क्लब, जॉर्जिया, यूएसए) आयोजित केली जाते. ८८ वर्षांपूर्वी २२ मार्च १९३४ रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. विम्बल्डनप्रमाणेच टेनिसमधील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमप्रमाणे ऑगस्टा मास्टर्स स्पर्धेच्या काही अनोख्या परंपरा आहेत.

या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंना अधिकृत आमंत्रणे पाठवली जातात आणि खेळाडूंनाही नियंत्रणाला प्रतिसाद देणे आवश्यक असते. या कारणास्तव इतर गोल्फ स्पर्धांच्या तुलनेत या स्पर्धेत खेळाडूंची संख्या कमी असते. १९८४ व १९९५ ऑगस्टा मास्टर्सचे विजेते ७० वर्षीय बेन क्रेनशॉ यांनी सांगितले की, त्यांना गेल्या ५० वर्षांपासून आमंत्रणे मिळत आहेत आणि त्यांनी सर्व निमंत्रण पत्रिका संभाळून ठेवल्या आहेत. निमंत्रण पत्रिका ‘ऑगस्टा नॅशनल गोल्फ क्लबचे संचालक मंडळ तुम्हाला यंदाच्या मास्टर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हार्दिक आमंत्रित करत आहे,’ या शब्दांनी सुरू होते. तसे खेळाडू आता ई-मेलद्वारे याचे उत्तर देत आहेत.ऑगस्टा मास्टर्सने दर्जा व गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही

बातम्या आणखी आहेत...