आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Challenge Of The Defending Champion Gujarat Today Against The Host Delhi, The Match Will Be Broadcast Live In The Evening. From 7.30 P.m

आयपीएल:यजमान दिल्लीसमाेर आज गत चॅम्पियन गुजरातचे आव्हान, सामन्याचे थेट प्रक्षेपण सायं. 7.30 वाजेपासून

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेव्हिड वाॅर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी सामना हाेणार आहे. हे दाेन्ही संघ दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. यजमान दिल्ली संघ आपल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे. यातून दिल्ली संघाला लीगमध्ये विजयाचे खाते उघडता येणार आहे. दुसरीकडे हार्दिकच्या नेतृत्वाखाली गतचॅॅम्पियन गुजरात संघ आता सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने सलामी सामन्यात घरच्या मैदानावर शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. यासह गुजरात संघाला लीगमध्ये दमदार सुरुवात करता आली. दिल्ली आणि गुजरात संघांना आपल्या पहिल्या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची उणीव भासली. मात्र, आता हेच खेळाडू संघांकडून खेळताना दिसणार आहे.