आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Country Got Its First Medal In The Paralympics In Tokyo; Bhavinaben Patel Won Silver Medal In Class 4 Category In Men's Singles

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक:भाविना पटेलनं रचला इतिहास, टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या सामन्यात जिंकले रौप्य पदक

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने टेबल टेनिसच्या महिला एकेरीत क्लास-4 प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी खेळाडू झोउ यिंगशी होता. यिंगने भाविनाचा 11-7, 11-5 आणि 11-6 असा पराभव करत सुवर्ण जिंकले. यामुळे भाविनाला रौप्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती भारतीय खेळाडू देखील आहे.

तत्पूर्वी, भाविनाने उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा पराभव केला होता. भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लावा रॅन्कोवीच पेरिचला सलग तीन गेम 11-5, 11-6, 11-7 असे हरवून उपांत्य फेरी गाठली.

भाविनाबेन पटेलने उपउपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या जॉइस डी ऑलिव्हिराचा 12-10, 13-11, 11-6 असा पराभव केला. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

जेव्हा ती एक वर्षाची होती तेव्हा तिला अर्धांगवायू झाला होता
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकणारी देशातील पहिली पॅरा खेळाडू भाविनाबेन पटेल, एक वर्षांची असताना चालण्याचा प्रयत्न करताना पडली, त्यावेळी तिला एका पायात अर्धांगवायू झाला होता, नंतर तिचा दुसरा पायालाही अर्धांगवायू झाला होता. नंतर संगणक शिकत असताना तिला टेबल टेनिस खेळण्याची संधी मिळाली.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी केले अभिनंदन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदक जिंकल्याबद्दल भाविनाबेन पटेल यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, भाविनाबेन पटेल यांनी इतिहास घडवला आहे. त्यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांना खेळाकडे आकर्षित केले जाईल.

क्रीडा दिवशी पदक मिळाल्याचा आनंद -
भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक म्हणाल्या- भाविना पटेलने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे आणि तोही राष्ट्रीय क्रीडा दिनी. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणती असेल की महिला खेळाडूने पदकाचे खाते उघडले आहे आणि ती महिला खेळाडू सुद्धा अशी आहे, जी व्हील चेअर वापरते.

वडील म्हणाले - येईल तेव्हा तिचे भव्य स्वागत करू
मुलीच्या विजयाबद्दल वडील हसमुखभाई पटेल म्हणाले, "तिने देशात नावलौकिक आणला. तिने सुवर्णपदक आणले नाही, पण आम्ही रौप्य पदकानेही आनंदी आहोत. ती परत आल्यावर आम्ही तिचे भव्य स्वागत करू."

बातम्या आणखी आहेत...