आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धा:द. आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो डुप्लेसिस

जोहान्सबर्ग17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डुप्लेसिस पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसू शकतो. आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धा पाहता क्रिकेट साऊथ आफ्रिका (सीएसए) त्याला टी-२० सामन्यांसाठी करारबद्ध करू शकते. याबाबत नवे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांच्यासमवेत चर्चा सुरू असल्याचे समजते. सीएसए या महिन्याच्या शेवटापर्यंत करार झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर करू शकते. यामध्ये अनेक खेळाडूंना करारबद्ध केले जाण्याची शक्यता आहे. सीएसएचे इनॉक अँक्वे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नवे प्रशिक्षक डुप्लेसिससह अनेक खेळाडूंशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. डुप्लेसिसने फेब्रुवारी २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र त्याची २०२१ आणि २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...