आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The First Infected In The Gamegram 6 Days Before The Start Of The Game, An Official Report Positive

ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट:खेळ सुरू होण्याच्या 6 दिवस आधी क्रीडाग्राममध्ये पहिला संक्रमित, एका अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

टोकियोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. ऑलिम्पिक सुरू होण्यास 6 दिवस बाकी आहेत, परंतु 4 दिवसांपूर्वी खुल्या झालेल्या क्रीडाग्राममध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले आहे. स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये तयारीमध्ये गुंतलेल्या अधिका्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. संक्रमित अधिकाऱ्याला आयोजकांनी 14 दिवस क्वारंटाईन केले आहे. दोन दिवसांपूर्वी जपानमध्ये एक खेळाडू आणि पाच कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. यासोबतच ज्या हॉटेलमध्ये ब्राझीलची ज्युडो टीम राहात आहे त्या हॉटेलमधील आठ कर्मचार्‍यांच्या संसर्गाची लागणे झाल्याचे आढळून आले होते.

22 ऑगस्टपर्यंत टोकियोमध्ये कडक निर्बंध
जपानमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. शुक्रवारी 3418 प्रकरणे आढळून आली आणि 24 लोकांचा मृत्यू. टोकियोमध्ये आपत्कालीन स्थिती 22 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या दरम्यान रात्री 8 वाजेपर्यंत उद्याने, हॉटेल, रेस्टॉरंट्स, थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सार्वजनिकरीत्या एकत्र येण्यावर बंदी
लॉकडाऊन लावण्याचा मुख्य उद्देश आहे, नागरिकांनी घरीच बसून टीव्हीवर ऑलिम्पिक पाहावे. सार्वजनिकरीत्या एकत्र येण्यावर बंदी असेल. स्टेडियममध्ये चाहते येणार नसल्याने ऑलिम्पिकवर निश्चित परिणाम होईल. टोकियोत नागरिकांना कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे.

बातम्या आणखी आहेत...