आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • The Football League Is The First To Launch, With A Turnover Of 1.37 Percent Of Spain's GDP; Out Of Which 1 Lakh 85 Thousand New Jobs Were Created

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:फुटबॉल लीग सर्वप्रथम सुरू, कारण उलाढाल स्पेनच्या जीडीपीच्या १.३७ टक्के; त्यातून १ लाख ८५ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअल माद्रिदचे खेळाडू सराव करताना. रिअल लीग तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. - Divya Marathi
रिअल माद्रिदचे खेळाडू सराव करताना. रिअल लीग तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
  • तीन महिन्यांनंतर स्पेनमध्ये आजपासून सुरू होणार लीग ला लीगाचे सामने
  • मे महिन्यामध्ये खेळाडूंनी सुरू केला होता सराव
  • फुटबॉल क्षेत्रातून स्पेनला ३५ हजार कोटी रु. कर मिळतो; इतर खेळांना पुनरागमनाची प्रतीक्षा

व्हर्च्युअल जगातून बाहेर पडत अखेर फुटबॉलच्या मैदानात पुनरागमन झाले. गुरुवारपासून फुटबॉलप्रेमींना लियोनेल मेसी, लुईस सुआरेज, अँटोनी ग्रीजमॅन, एडन हजार्ड, सर्जियो रामोस, करीम बेंजेमासारखे आपले आवडते खेळाडू मैदानात दिसतील. युरोपच्या अव्वल ५ फुटबॉल लीगमध्ये समावेश असलेल्या ला लीगाचे लॉकडाऊननंतर पुनरागमन होत आहे. ही स्पॅनिश फुटबॉल लीग ११ मार्चपासून स्थगित होती. विश्रांतीनंतर ११ जूनपासून लीगचे सामने सुरू होतील. स्पेनमध्ये फुटबॉलशिवाय इतर खेळांच्या पुनरागमनावर चर्चा होत नाही. कारण देशातील सर्वात मोठी फुटबॉल इंडस्ट्री. फुटबॉलची उलाढाल स्पेनच्या जीडीपीच्या १.३७ टक्के आहे. त्यातून १ लाख ८५ हजार नोकऱ्या निर्माण होतात. फुटबॉल क्षेत्रातून देशाला ४.१ बिलियन युरो (३५ हजार २२५ कोटी रुपये) कर मिळतो.

ला लीगाला ३८ हजार कोटी रुपयांचा अधिक फायदा झाला 

स्पॅनिश फुटबॉल लीग (ला लीगा) उत्पन्नाच्या बाबतीत युरोपमधील दुसरी सर्वात मोठी लीग आहे. त्याचप्रमाणे जगातील दुसरी सर्वाधिक मौल्यवान फुटबॉल लीगदेखील आहे. ला लीगाला गेल्या सत्रात ४४७९ मिलियन युरोचा (जवळपास ३८३६३ कोटी रुपये) फायदा झाला होता. लॉकडाऊनच्या सुरुवातीला झालेल्या माहितीनुसार, जर फर्स्ट व सेकंड डिव्हिजनचे सामने रद्द झाले तर स्पॅनिश फुटबॉलला ६७८.४ मिलियन युरोचे (जवळपास ५८०० कोटी रुपये) नुकसान झाले असते. यात टीव्ही हक्कातून ५४९ मिलियन युरो (४७०० कोटी रुपये), सब्सक्रिप्शनद्वारे ८८ मिलियन युरो (७५४ कोटी रुपये) व तिकिटातून ४१.४ मिलियन युरोचे (३५५ कोटी रुपये) नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे स्पेनमध्ये सर्व फुटबॉल लीग वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बार्सिलोनाच्या गेरार्ड पिकने म्हटले, “आम्हाला सामन्याची प्रतीक्षा असून चाहत्यांवर बंदी आहे. आम्हाला विना चाहत्यांच्या उपस्थितीत खेळायला आवडत नाही.’

कॅटेलोनियाच्या अमेरिकन फुटबॉल टीमचे खेळाडू परतले नाही 

कॅटेलोनियाची अमेरिकन फुटबॉल टीम बेडेलोना ड्रेक्सचे सहायक प्रशिक्षक झेवियर गोंजालो म्हणतात की, “संघातील खेळाडू मैदानापासून दूर आहेत. त्यांना स्पर्धा सुरू होईल की नाही हेदेखील माहिती नाही. आम्ही अद्याप पूर्णपणे सराव सुरू करू शकत नाही. खेळाडू घरीच फिटनेस करत आहेत. जगभरातील अनेक खेळाडू येथे खेळण्यासाठी येतात. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सर्वजण आपापल्या देशात परतले. या वर्षी लीगा नॅशनल डी फुटबॉल अमेरिकानो (एलएनएफए) सुरू होईल की नाही. परतल्यावर खेळात काय बदल होतील. त्यामुळे खेळाडू परतले नाहीत.’

बातम्या आणखी आहेत...