आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The German Athlete Who Said Neeraj Can't Even Touch Me, He Became Ineligible After 3 Throws; Gavaskar Left The Commentary And Celebrated

PHOTOS नीरज चोप्राचा ऐतिहासिक विजय:ज्या जर्मन अ‍ॅथलिटने म्हटले- नीरज मला स्पर्शही करु शकणार नाही, तो 3 थ्रोनंतर ठरला अपात्र; गावस्कर यांनी कमेंट्री सोडून साजरा केला आनंद

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीरजने संपूर्ण देशाला उत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे.

भाला फेकणाऱ्या नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत नीरजने 87.58 मीटर थ्रो केली. कोणताही खेळाडू त्याभोवती फिरू शकत नव्हता. भालाफेकमध्ये जर्मनीचा माजी विश्वविजेता जोहान्स व्हेटरने ऑलिम्पिकपूर्वी नीरजला आव्हान दिले होते.

वेटर म्हणाला होता की नीरज चांगला आहे. फिनलँडमध्ये त्याची भालाफेक 86 मीटरचे अंतर कापू शकते, पण ऑलिम्पिकमध्ये तो मला हरवू शकणार नाही. पण नीरजने त्याला केवळ मागेच सोडले नाही, तर आपल्या नावावर सुवर्ण जिंकले. जर्मन खेळाडू बॉटम -3 मध्ये असल्यामुळे 3 फेऱ्यांनंतर अपात्र ठरला.

यानंतर नीरजने संपूर्ण देशाला उत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे. केवळ देशातील लोकांनीच नाही तर ट्रेंट ब्रिजवर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटीतही हा विजय साजरा झाला. सुनील गावस्करसह सर्व माजी क्रिकेटपटू नीरजचा सामना पाहताना दिसले. त्यांनी आनंदही साजरा केला. हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाने 6 पदके जिंकली होती. तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत.

नीरज चोप्राला इतिहास रचताना पाहून भारताचे माजी दिग्ग क्रिकेटर सुनील गावस्कर.
नीरज चोप्राला इतिहास रचताना पाहून भारताचे माजी दिग्ग क्रिकेटर सुनील गावस्कर.
जोहानेस वेटरने ऑलिम्पिकपूर्वी म्हटले होते की, नीरज त्याला हरवू शकणार नाही. मात्र नीरजने बोलण्याऐवजी आपल्या कृतीतून उत्तर दिले.
जोहानेस वेटरने ऑलिम्पिकपूर्वी म्हटले होते की, नीरज त्याला हरवू शकणार नाही. मात्र नीरजने बोलण्याऐवजी आपल्या कृतीतून उत्तर दिले.
वेटर पहिल्या राउंडमध्ये 82.52 मीटरचा थ्रो करु शकला. दुसरा आणि तिसरा थ्रो अयशस्वी राहिला. यानंतर त्याला डिस्क्ववालिफाय करण्यात आले.
वेटर पहिल्या राउंडमध्ये 82.52 मीटरचा थ्रो करु शकला. दुसरा आणि तिसरा थ्रो अयशस्वी राहिला. यानंतर त्याला डिस्क्ववालिफाय करण्यात आले.
नीरजने पहिल्या थ्रोमध्ये 87.03 मीटर दूर भाला फेकला. या थ्रोनंतरच तो खूप कॉन्फिडेंट दिसत होता.
नीरजने पहिल्या थ्रोमध्ये 87.03 मीटर दूर भाला फेकला. या थ्रोनंतरच तो खूप कॉन्फिडेंट दिसत होता.
नीरज पहिल्या थ्रोमध्येच समजून गेला होता की, हा थ्रो कोणते न कोणते मेडल अवश्य जिंकेल.
नीरज पहिल्या थ्रोमध्येच समजून गेला होता की, हा थ्रो कोणते न कोणते मेडल अवश्य जिंकेल.
नीरज चोथ्या आणि पाचव्या राउंडनंतर खूश नव्हता. त्याने या दोन्ही राउंडमध्ये फाउल थ्रो केला.
नीरज चोथ्या आणि पाचव्या राउंडनंतर खूश नव्हता. त्याने या दोन्ही राउंडमध्ये फाउल थ्रो केला.
नीरजच्या थ्रोनेच इव्हेंट समाप्त झाला. सहाव्या राउंडमध्ये नीरजने 84 मीटर दूर भाला फेकला.
नीरजच्या थ्रोनेच इव्हेंट समाप्त झाला. सहाव्या राउंडमध्ये नीरजने 84 मीटर दूर भाला फेकला.
पाकिस्तानचा नदीम अरशद पाचव्या क्रमांकावर राहिला.
पाकिस्तानचा नदीम अरशद पाचव्या क्रमांकावर राहिला.
तिरंग्यासह भारताचा गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा
तिरंग्यासह भारताचा गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा
नीरज व्यतिरिक्त 86.67 मीटर थ्रोसह चेकच्या जाकुब वेदलेच दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर 85.44 मीटरच्या थ्रोसह चेकचा वितेस्लाव वेसेली तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
नीरज व्यतिरिक्त 86.67 मीटर थ्रोसह चेकच्या जाकुब वेदलेच दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर 85.44 मीटरच्या थ्रोसह चेकचा वितेस्लाव वेसेली तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
पोडियमवर गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा. अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय.
पोडियमवर गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा. अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय.
बातम्या आणखी आहेत...