आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Haryana Boy Showed His Batting Skills In England, Fighting In The Final On Sunday

अमित सुवर्ण पदकाच्या फक्त एका पाऊलावर:हरियाणाच्या मुलाने इंग्लंडमध्ये दाखवला पंचचा दम, रविवारी फायनल लढत

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणातील रोहतक येथील बॉक्सर अमित पंघाल राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या जवळ पोहोचला आहे. शनिवारी सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने झांबियाच्या पॅट्रिक चिनयांबाला त्याच्या ठोश्याने बाद केले. त्याच्या या शानदार विजयानंतर घरातील सर्व सदस्यांच्या आनंदाला पारा उरला नव्हता.

सामन्या दरम्यान घरातील सर्व सदस्य टीव्हीकडे डोळे लावून बसले होते. लहान मुलांपासून तरूण आणि महिलांपर्यंत सगळे एकत्र बसून सामना पाहत होते. पंघालने सामना जिंकल्याने विशेषत: महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

टाळ्यांच्या कडकडाटाने खोली दुमदुमून गेली. पंघाल उद्या (रविवारी) अंतिम सामना खेळणार आहे. आता तो देशाच्या झोळीत सुवर्ण पदक टाकेल, अशी आशा आहे.

मायना गावात जन्मलेल्या अमित पंघालने वयाच्या 10 व्या वर्षी बॉक्सिंग खेळण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या कठोर मेहनतीने तो आज अव्वल क्रमांकाचा बॉक्सर आहे. आता तो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

अमित पंघाल यांचे वडील एक एकराच्या शेतीत काम करतात

अमित पंघालचे वडील विजेंद्र सिंह यांनी सांगितले की, ते शेती करतात. त्यांच्याकडे केवळ एक एकर जमीन आहे. यातून त्यांनी घर चालवण्याचा आणि दोन्ही मुलांच्या संगोपनाचा खर्च उचलला आहे. आपल्या मुलांना कोणताही अडथळा न येता सहज पुढे जाता यावे म्हणून त्यांनी शेतात काबाड कष्ट केले आहे.

मोठा भाऊ देखील बॉक्सर

विजेंदर सिंहने सांगितले की, अमित पंघालचा मोठा भाऊ अजय देखील बॉक्सिंग करतो. अजयने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या पंचाची ताकद दाखवून दिली आहे. ज्यासोबत आता अजय सैन्यात दाखल झाला आणि सध्या तो देशाची सेवा करतोय. त्याने त्याच्या धाकट्या भावास अमित यालाही बॉक्सिंगसाठी प्रेरित केले.

अमितचा स्वभाव चंचल आहे

ते म्हणाले की, अमित पंघाल यांचा सुरुवातीपासूनच चंचल स्वभाव होता. तोही सर्वांचा लाडका आहे. जेव्हा तो 10 वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याचा भाऊ अजय याच्यासोबत गावातील त्याच शेतात बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. खेळासोबतच तो अभ्यासातही चांगला आहे. अभ्यासही कधी सोडला नाही.

बातम्या आणखी आहेत...