आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनप्रीतसिंगला विश्वास:हॉकी टीम पुढील वर्षीच निश्चित करणार 2024 ऑलिम्पिक प्रवेश

चंदीगड (गौरव मारवाह)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अाॅलिम्पिक पदक वडिलांचे स्वप्न हाेते; अाईने दिले पाठबळ

भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांचा ४१ वर्षांचा दुष्काळ समाप्त करताना पोडियमवर स्थान मिळवले. आता सर्वजण त्या यशाच्या जल्लोषात व्यग्र आहेत. संघाचा कर्णधार मनप्रीतसिंगचाही त्यात समावेश आहे, मात्र तो लवकरच आगामी स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. मनप्रीतने म्हटले की, ‘मी या ऐतिहासिक विजयाचा भाग असल्याने आनंदी आहे. माझे व संघाचे लक्ष्य आता पुढील वर्षी चीनमध्ये होणारी आशियाई स्पर्धा आहे. या स्पर्धेतून आम्ही पुढील ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवू शकतो. संपूर्ण संघाचे लक्ष्य सध्या हेच असेल. आम्ही राष्ट्रकुल स्पर्धेचीदेखील तयारी करू. यंदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन भारत करेल. चांगला खेळ करून देशाचा सन्मान करण्याची जबाबदारी आमच्यावर असणार आहे.’ आमच्या डिफेंडर्सनी चेंडू रोखण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती आणि अखेर श्रीजेश रोखण्यात करण्यात यशस्वी ठरला. तो खूप अविस्मरणीय क्षण होता आणि त्याचे संपूर्ण श्रेय संघाला जाते,असेही मनप्रीतने जर्मनीविरुद्ध अखेरच्या पेनल्टी कॉर्नरबाबत अापले मत मांडले.

अाॅलिम्पिक पदक वडिलांचे स्वप्न हाेते; अाईने दिले पाठबळ
मनप्रीत त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. घरी परतल्यानंतर त्याने पदक आईच्या गळ्यात घातले. त्याने म्हटले की,‘हे पदक माझ्या वडिलांचे स्वप्न होते. ते आता नाहीत, मात्र पदक माझ्या गळयात पाहून आई भावुक झाली होती आणि रडायला लागली. हा विजय माझे कुटुंब व देशासाठी विशेष आहे.’

आता देशातील युवा हॉकीपटंूूच्या गुणवत्तेला मिळेल वेगाने चालना
‘आता देशातील हॉकी बदलत आहे. या पदकामुळे हॉकीला नक्की प्रोत्साहन मिळेल. पुरुष आणि महिला दोन्ही हॉकी संघांना चांगले खेळाडू मिळतील. ही एक प्रकारची क्रांती आहे. आता जास्तीत जास्त खेळाडू हॉकी खेळतील. तरुण या खेळात सामील होतील, तितका हा खेळ पुढे जाईल. यातून युवांच्या गुणवत्तेला चालना मिळेल, असे ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...