आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संघासाठी सलामीवीरांचे अपयश अद्यापही कायम आहे. यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे संकेत लिस्टरशायरविरुद्ध सराव सामन्यादरम्यान मिळाले. भारतीय संघाला गुरुवारी सराव सामन्यात सलामीवीर कर्णधार राेहित शर्मा (२५) आणि शुभमान गिल (२१) झटपट बाद झाले. त्यामुळे लंच टाइमपर्यंत भारताने पाच गडी गमावत ९० धावा काढल्या होत्या. आता भारताचे माजी कर्णधार विराट कोहली (९) आणि श्रीकार भरत (६) मैदानावर कायम आहेत. लिस्टरशायर संघाकडून राेमन वॉकरने सर्वाधिक तीन बळी घेतले. तसेच प्रसिध कृष्णा आणि डेव्हिसने प्रत्येकी एक गडी बाद केला.
येत्या १ जुलैपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील एकमेव कसाेटी सामन्याला सुरुवात होणार आहे. याच कसाेटीच्या तयारीसाठी वॉर्मअप सामन्याचे आयाेजन करण्यात आले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाचा सलामीवीर व कर्णधार राेहित शर्मा २५ आणि शुभमान गिल २१ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतले. हनुमा विहारीने ३, जडेजाने १३ धावांची खेळी करून पॅव्हेलियन गाठले. आता कोहली आणि श्रीकारकडून मोठ्या खेळीची आशा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.