आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:भारतीय महिला संघ तीन वर्षांत खेळणार 65 सामने

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला क्रिकेट संघ आगामी तीन वर्षांमध्ये जवळपास ६५ सामने खेळणार आहे. यामध्ये फक्त दाेनच कसाेटी सामन्यांचा समावेश आहे. यात २७ वनडे आणि ३६ टी-२० सामन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आयसीसीच्या वतीने मंगळवारी महिलांच्या फ्यूचर टूर प्राेग्रामची (एफटीपी) घाेषणा करण्यात आली. यामध्ये आगामी तीन वर्षांतील तिन्ही फाॅरमॅटच्या सामने आयाेजनाची माहिती देण्यात आली. यानुसार आता तीन वर्षांत जवळपास ३०१ क्रिकेटचे सामने हाेतील. यामध्ये सात कसाेटी, १३५ वनडे आणि १५९ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. यादरम्यान टी-२० विश्वचषक व आयसीसीच्या दुसऱ्या इव्हेंटचा समावेश नाही. २०२३-२४ या सत्रात इंग्लंड व आॅस्ट्रेलिया संघांत घरच्या मैदानावर प्रत्येकी १ कसाेटी सामना हाेणार आहे. मे २०२२ ते एप्रिल २०२५ पर्यंत दाेनच कसाेटी सामन्यांचे आयाेजन केले जाणार आहे. तीन वर्षांत इंग्लंड संघ सर्वाधिक पाच कसाेटी सामने खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...