आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रीमियर लीग (WPL):महिला प्रीमियर लीगचे सर्वात महागडे तिकीट 4000 रुपयांचे

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्या सत्रासाठीची तिकीट विक्री बुधवारपासून सुरू झाली. लीगचे सर्वात स्वस्त तिकीट १०० रुपये आणि सर्वात महागडे तिकीट ४०० रुपयांचे आहे. बीसीसीआय महिला क्रिकेटमध्ये चाहत्यांची संख्या वाढवू इच्छितो, त्यामुळे तिकीट दर कमी ठेवला आहे. लीगमध्ये महिलांना मोफत प्रवेश दिला जाईल. पहिला सामना ४ मार्च रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सायंकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी उद्घाटन सोहळा रंगेल. यात कृती सेनन, कियारा अडवाणी व एपी ढिल्लो परफॉर्म करतील. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन लीगचे मुख्य गीत सादर करेल. यापूर्वी, बीसीसीआयचे सचिव जय शहाने घोषणा केली होती की, या लीगचे मुख्य प्रायोजक टाटा असेल. टाटाने ५ वर्षांसाठी करार केला आहे.

बातम्या आणखी आहेत...