आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The National Coach Was Asked To Fix The Olympic Qualifying Match Manika Batra

मणिकाचा आरोप:राष्ट्रीय कोचने ऑलिम्पिक पात्रता सामना फिक्स करायला सांगितले होते

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बत्राचे भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या नोटिसीला उत्तर

टेबल टेनिसपटू मणिका बत्राने आपले राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉयवर खळबळजनक आरोप केले आहेत. मणिकानुसार, सौम्यदीपने तिच्यावर सामना फिक्स करण्याचा दबाव आणला होता. तिच्याकडे याबाबत सबळ पुरावे आहेत. मणिकाने हे आरोप भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या नोटिसीला उत्तर देताना केले आहेत.

मणिका टोकियो ऑलिम्पिमध्ये महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचली होती. मणिकानुसार, ‘सौम्यदीपने मार्च २०२१ मध्ये दोहा पात्रता स्पर्धेत दबाव आणला होता. ते म्हणाले होते, मी त्यांच्या प्रशिक्षणार्थी खेळाविरुद्ध सामना गमवावा. जेणेकरून तिला ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता येईल. थोडक्यात, मला मॅच फिक्सिंग करण्यास सांगण्यात आले होते. यासाठी ते हॉटेलमधील माझ्या खोलीत आले हाेते. ते माझ्याशी २० मिनिटे बोलले. ती प्रशिक्षणार्थी खेळाडूही त्यांच्यासोबत होती. मात्र मी त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही. तत्काळ ही माहिती फेडरेशनला दिली होती. मात्र या दबाव आणि धमकीचा परिणाम माझ्या खेळावर झाला. यामुळेच मी ऑलिम्पिकमध्ये सौम्यदीपची मदत घेणे टाळले. सौम्यदीप माझ्यासोबत असते तर मी सामन्यावर फोकस करू शकले नसते,’ असे मणिकाने पत्रात म्हटले आहे. मणिका आणि सुतीर्था मुखर्जी या दोघींनी रॉयच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे. सुतीर्थाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर मणिकाने जागतिक क्रमवारीच्या आधारे ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती, तर सुतीर्थाने सामना जिंकून. ऑलिम्पिकमध्ये मणिका तिसऱ्या, तर सुतीर्था दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली होती.

बातम्या आणखी आहेत...