आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रेंच ओपनच्या दुसऱ्या सेमीफायनलदरम्यान अशी घटना पाहायला मिळाली, जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. एक मुलगी जी बळजबरीने कोर्टात घुसली आणि तिने गळ्यात घातलेली साखळी जाळीला बांधली आणि जमिनीवर पडली. त्यामुळे सुरु असलेला खेळ थांबवावा लागला. तर हे दृष्य पाहून खेळाडूंनी मैदानातून पळ काढला.
सामनाधिकार्यांनी तातडीने येऊन मुलीच्या गळ्यातील जाळीला बांधलेली साखळी काढून तिला मैदानाबाहेर घेवून गेले आणि त्यानंतर काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. यावेळी महिला आंदोलकांच्या टी-शर्टवर 'आमच्याकडे 1028 दिवस शिल्लक आहेत' असे लिहिले होते. आंदोलकाचे नाव अलीजी असून तिचे वय 22 वर्षे आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
तिने कशासाठी केला निषेध़
वास्तविक, ही मुलगी डर्नियर रिनोव्हेशन (Dernier Renovation) नावाच्या चळवळीशी संबंधित आहे, हवामान बदलांसाठी निदर्शने करीत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर फ्रान्सने हवामान बदलावर काम केले नाही तर 1028 दिवसांनंतर काहीही शिल्लक राहणार नाही. आंदोलक अलीजी ही पर्यावरणवादी असल्याचेही बोलले जाते.
काय घडलं मॅचमध्ये?
कॅस्पर रुडने शानदार खेळाचे प्रदर्शन करत 2 तास 55 मिनिटे रंगलेल्या सामन्यात मारिन सिलिकचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. जिथे त्याचा सामना राफेल नदालशी होणार आहे. 23 वर्षीय कॅस्पर रुडने अनुभवी मारिन सिलिककडून पहिला सेट 3-6 असा गमावला. यानंतर त्याने दुसऱ्या सेटमधून शानदार पुनरागमन करत सलग तीनही सेट 6-4, 6-2, 6-2 असे जिंकले. तत्पूर्वी, त्याने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या 19 वर्षीय होल्गर रूनचा 6-1, 4-6, 7-6, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
कॅस्पर रुड पहिल्यांदाच नदालशी भिडणार
अंतिम फेरीत कॅस्पर रुडचा सामना प्रथमच राफेल नदालशी होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर त्याने सांगितले की, माझ्या आवडत्या खेळाडू विरुद्ध अंतिम फेरीत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. दोघांमधील सामना 5 जूनला होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.