आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC चा नवा गेम प्लॅन:टी-20 आणि वन-डे विश्व चषकात संघांची संख्या वाढण्याची शक्यता

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मागचा टी20 वर्ल्ड कप 2016 मध्ये वेस्टइंडीजने जिंकला होता. - Divya Marathi
मागचा टी20 वर्ल्ड कप 2016 मध्ये वेस्टइंडीजने जिंकला होता.
  • 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये कमी केले होते संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी-20 आणि वन-डे विश्व चषकासाठी नवीन प्लॅन तयार करण्याच्या विचारात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICC दोन्ही टुर्नामेंटमध्ये संघ वाढवण्यावर विचार करत आहे. टी-20 मध्ये संघांची संख्या 16 वरुन 20 करण्याचा विचार सुरू आहे.

ईएसपीएन क्रिकइंफोने सांगितल्यानुसार, यंदाचा टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. यात काहीच बदल केले जाणार नाहीत. पण, ICC 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये संघांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.

2019 मध्ये कमी केले होते संघ

दरम्यान, वनडे वर्ल्ड कपमध्येही संघांची संख्या वाढवली जाऊ शकते. यापूर्वी, 2019 वनडे वर्ल्ड कपमध्ये संघांची संख्या 14 वरुन 10 करण्यात आली होती. तेव्हा, ब्रॉडकास्टर्सना ध्यानात ठेवून आणि सामन्यांना रंजक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता किती संघ वाढतील आणि किती संघ असतील, याचा विचार सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, वनडे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा 14 संघ असू शकतात.

बातम्या आणखी आहेत...