आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Opening Ceremony Of The Olympic Games In Tokyo From Today. 4.00 P.m. 11 Thousand 238 Players From 206 Countries Participated

टाेकियाे:आजपासून टोकियोत ऑलिम्पिक महाकुंभ, उद्घाटन दु. 4.00 वा; 206 देशांतील 11 हजार 238 खेळाडू सहभागी

टाेकियाे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचे सुपरस्टार सज्ज, पहिल्याच दिवशी दीपिका, प्रवीण जाधव भेदणार लक्ष्य

काेराेना महामारीच्या आव्हानाला यशस्वीपणे परतवून लावत आता जागतिक दर्जाचे खेळाडू टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेत आपले काैशल्य दाखवण्यास सज्ज झाले. जपानमध्ये आज शुक्रवारपासून टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेत २०६ देशांतील ११ हजार २३८ खेळाडू सहभागी झाले आहेत. हे सर्व खेळाडू स्पर्धेत ३३ खेळ प्रकारांत उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्सुक आहेत. यातून ३३९ खेळाडू ऑलिम्पिक चॅम्पियनच्या बहुमानाचे मानकरी ठरणार आहेत. महाराष्ट्रातील नेमबाज राही सरनाेबत, तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे, साताऱ्याच्या प्रवीण जाधवसह १२६ सदस्यीय भारतीय संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारतीय संघातील १२६ खेळाडू हे स्पर्धेतील १८ खेळ प्रकारांत आपले नशीब आजमवणार आहेत.

पहिल्याच दिवशी दीपिका, प्रवीण जाधव भेदणार लक्ष्य
जगातील नंबर वन महिला तिरंदाज दीपिका कुमारी आणि महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवला स्पर्धेतील आपल्या सुवर्णपदकाच्या माेहिमेला पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात करण्याची संधी आहे. उद्घाटन साेहळ्यानंतर हाेणाऱ्या या इव्हेंटमध्ये प्रवीण जाधव, दीपिका कुमारी, अतानू दास, तरुणदीप हे रॅकिंग राउंडमध्ये सहभागी हाेतील. दर्जेदार खेळीतून भारताचे तिरंदाजीतील एेतिहासिक पदक निश्चित करण्याचा या सर्वांचा प्रयत्न असेल.

बातम्या आणखी आहेत...