आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल अनादी बरुआ माजी खेळाडू, प्रशिक्षक, अभिक चटर्जी, ओडिशा एफसी चे जीएम रजत रोज, राष्ट्रीय फुटबाॅलपटू
माेराेक्काे आणि पाेर्तुगाल संघांनी ४-३-३ फाॅर्मेशनच्या बळावर सर्वाेत्तम कामगिरी करत अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला. यादरम्यान माेराेक्काे संघाची गत स्पेन टीमविरुद्धची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यांनी सुरेख डिफेन्स करताना स्पेनचा गाेलचा प्रयत्न हाणुन पाडला. त्यामुळे दाेन वेळा अतिरिक्त वेळेतही स्पेन संघाला गाेल करता आला नाही. त्यामुळे माेराेक्काे संघाची संरक्षण फळी अधिकच मजबूत मानली जात आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केल्याने टीमच्या खेळाडूंमध्ये सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण झाली आहे. यातून संघाने आता युराेपियन पाेर्तुगाल टीमला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. यादरम्यान टीमला आपल्या आफ्रिकन चाहत्यांचेही माेठे पाठबळ लाभत आहे. दरम्यान, पाेर्तुगाल संघाच्या विजयाची मदार ही राेनाल्डाेसह पेपे, रामाेस, नवास, सिल्वा आणि काेस्टावर असेल.
एमबापेला राेखण्याचे केनसमाेर आव्हान : फ्रान्स आणि इंग्लंड हे दाेन्ही तुल्यबळ संघ आहेत. त्यामुळे या दाेन्ही संघांमधील सामना हा अटीतटीचा हाेणार आहे. गत वेळचा गाेल्डन बूट हाेल्डर आणि टीमचा फाॅरवर्ड हॅरी केन आता इंग्लंडला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, सध्या त्याला समाधानकारक खेळीची लय गवसली नाही. त्यामुळेच त्याच्यासमाेर फाॅर्मात असलेल्या किलीयन एमबापेला राेखण्याचे माेठे आव्हान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.