आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Privilege Of Hosting Is More Expensive; Only Russia Has Benefited In 54 Years

यजमानांना आर्थिक झळ:यजमानपदाचा बहुमान अधिक खर्चिक; 54 वर्षांत फक्त रशियालाच फायदा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा आयाेजनासाठी यजमानपदाचा बहुमान मिळणे, ही महासंघासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. मात्र, दिवसेंदिवस हाच बहुमान आता अधिकच खर्चिक हाेत आहे. कतार पहिल्यांदाच या यजमानपदाचा बहुमान भूषवत आहे. हे यजमानपद जाहीर झाल्यापासून १२ वर्षात कतारला जवळपास २४ लाख काेटींचा खर्च करावा लागला. यातील सर्वाधिक खर्च हा स्पर्धेच्या आयाेजनादरम्यान इन्फ्रास्ट्रक्चरवर केला जाताे. यंदाही कतारला सर्वाधिक खर्च यावर करता आला. लुसाने विद्यापीठातील एका संशाेधनकर्त्याने याबाबत वर्ल्डकप आयाेजनाचे समीकरण मांडले आहे. यामध्ये १९६४ ते २०१८ पर्यंत फक्त रशिया महासंघच फायद्यात हाेता. रशिया महासंघालाच फक्त यातून आर्थिक कमाई करता आली. इतर महासंघासाठी हे यजमानपद तिजाेरीवर भार टाकणारे ठरले. रशियाने १६०० काेटी कमावले हाेते.

बातम्या आणखी आहेत...