आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Return Of Ejaz Patel, Who Took Ten Wickets; New Zealand Squad Announced, Test Series Against England From 2 June

पुनरागमन:दहा बळी घेणाऱ्या एजाज पटेलचे पुनरागमन; न्यूझीलंड संघ जाहीर, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका 2 जूनपासून

वेलिंग्टन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाविरुद्ध वानखेडे कसोटी सामन्यात १० बळी घेणाऱ्या फिरकीपटू एजाज पटेलला दमदार पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्याची आगामी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात निवड झाली आहे. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी न्यूझीलंडच्या २० सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात आली. न्यूझीलंड टीम आगामी जून महिन्यात इंग्लंडचा दाैरा करणार आहे. २ जूनपासून कसोटी मालिकेला सुुरुवात होईल. सलामीचा कसोटी सामना एेतिहासिक लाॅर्ड््स मैदानावर खेळवला जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर विलियम्सन हा संघामध्ये सहभागी होईल. त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंड टीम हा दाैरा करणार अाहे. संघामध्ये ऑफ स्पिन ऑलराउंडर ब्रेसबेल, यष्टिरक्षक फलंदाज फ्लेचर व वेगवान गोलंदाज टिकनेरचा समावेश करण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...