आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांडगे म्हणाले:महाराष्ट्र केसरीचा अधिकार कुस्तीगीर परिषदेलाच - लांडगे

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना यांनी धर्मादाय आयुक्त यांच्या निगराणी खाली गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतल्या. या निवडणूक मध्ये जे हरले ते सुड भावनेने संघटनेचे नाव बदनाम करत आहे. खोट्या तक्रारी करत आहे. कोरोना काळात दोन वर्ष कुस्ती स्पर्धा होऊ शकला नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना हुकूमशाही पद्धतीने बरखास्त करणे चुकीचे होते. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्याबाबतची बाजू भक्कमपणे मांडली त्यामुळे आमची संघटना हीच खरी असल्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार कुस्तीगीर परिषदेला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हेच संघटनेचे अध्यक्ष राहणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाची दिशाभूल करण्यात आल्याने गैरसमज मधून बरखास्तीचा निर्णय घेतला गेला होता असे मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली आहे. यातून या स्पर्धेच्या आयाेजनाचा तिढा सुटणार असल्याचे चित्र आहे. लांडगे म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात यावी यासाठी सात जिल्ह्यांनी प्रस्ताव पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...