आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Second Defeat Of The Indian Women's Team, A 5 0 One sided Victory Over The Host Belgium

प्रोहॉकी लीग:भारतीय महिला संघाचा दुसरा पराभव, यजमान बेल्जियम संघाचा 5-0 ने एकतर्फी विजय

एंटवर्प22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला संघाला प्राेहॉकी लीगमधील आपली पराभवाची मालिका खंडित करण्यात पुन्हा अपयश आले. यजमान बेल्जियम संघाने लीगच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी भारताचा पराभव केला. बेल्जियमने घरच्या मैदानावर ५-० ने सामना जिंकला. नेलेन बारबरा (२ रा मि.), एंगलबर्ट चार्लोट (४ था मि.), राये अबी (१९ वा मि), वांडेर स्टेफनी (२३ वा मि.) आणि एम्बरेने (३६ वा मि.) प्रत्येकी एक गोल करत यजमान टीमचा धडाकेबाज विजय निश्चित केला. भारतीय संघाचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. यासह भारताला लीगच्या दहापैकी पाच सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. आता भारतीय महिला संघाला येत्या १८ व १९ जून राेजी अर्जेंटिनाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...