आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस 2021-22:21 व्या शतकातील सर्वात छोटी अॅशेस; 42 दिवस चालेल मालिका

मेलबर्न4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलिया व इंग्लंड 8 डिसेंबरपासून मालिका
  • आॅस्ट्रेलियाचा 33 व इंग्लंडचा 32 वेळा विजय

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबामध्ये सुरुवात होईल. मालिकेतील अंतिम सामना पुढील वर्षी १४ ते १८ जानेवारीदरम्यान पर्थमध्ये खेळवला जाईल. म्हणजे ५ सामन्यांची मालिका केवळ ४२ दिवस चालेल. ही २१ व्या दशकातील सर्वात छोटी अॅशेस असेल. २००६-०७ व २०१०-११ मध्ये मालिका ४४ दिवसांची होती.

अॅडिलेडमध्ये होणारी दुसरी कसोटी दिवस-रात्र असेल. २०१७ मध्ये याच मैदानावरील सामन्यात ऑस्ट्रेलियाने १२० धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे व सिडनीमध्ये न्यू इयर कसोटी होईल. अॅशेसची ही ७२ वी मालिका असेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ३३ आणि इंग्लंडने ३२ मालिका जिंकल्या, ६ बरोबरीत राहिल्या. इंग्लंड संघ १९८७ नंतर ऑस्ट्रेलियामध्ये केवळ एकदा अॅशेस जिंकू शकला आहे. गत मालिका २-२ ने बरोबरीत राहिली. मात्र, त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया मालिकेचा विजेता असल्याने त्याने ट्रॉफी परत केली होती. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ २७ नोव्हेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध होबार्टमध्ये कसोटी सामना खेळेल. हा आशियाबाहेर अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना असेल.

अॅशेस 2021-22 चा कार्यक्रम

पहिली 8-12 डिसेंबर ब्रिस्बेन दुसरी (d/n) 16-20 डिसेंबर अॅडिलेड तिसरी 26-30 डिसेंबर मेलबर्न चौथी 5-9 जानेवारी सिडनी पाचवी 14-18 जानेवारी पर्थ

गत मालिका २-२ ने बरोबरीत राहिली. मात्र, त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया मालिकेचा विजेता असल्याने त्याने ट्रॉफी परत केली होती. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ २७ नोव्हेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध होबार्टमध्ये कसोटी सामना खेळेल. हा आशियाबाहेर अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना असेल.

बातम्या आणखी आहेत...