आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल स्पर्धा:चार वर्षांपूर्वी निश्चित केलेले लक्ष्य बर्मिंगहॅममध्ये गाठले

बर्मिंगहॅम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगलीच्या २१ वर्षीय वेटलिफ्टर संकेत सलगरने चार वर्षांपूर्वी निश्चित केलेले लक्ष्य माेठ्या मेहनतीच्या बळावर बर्मिंगहॅममध्ये गाठले. महाराष्ट्राच्या या युवा वेटलिफ्टरने शनिवारी २२ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पदकाचे खाते उघडून दिले. त्याने पुरुषांच्या ५५ किलाे वजन गटात राैप्यपदकाची कमाई केली. त्याने एकूण २४८ किलाे (११३-१३५ कि.) वजन उचलले. तसेच भारताच्या मीराबाई चानूने महिलांच्या ४९ किलाे वजन गटात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यासह भारताने एकाच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदके जिंकली. यामध्ये प्रत्येकी एका सुवर्णसह राैप्य आणि कांस्यपदकाचा समावेश आहे. संकेतपाठाेपाठ गुरुराज पुजारीने ६१ किलाे वजन गटामध्ये कांस्यपदक पटकावले. सांगलीच्या संकेतला दुखापतीमुळे राैप्यवर समाधान मानावे लागले. त्याने एकूण २४८ किलाे (११३-१३५ कि.) वजन उचलले. त्याचे हाताच्या काेपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे अवघ्या एका किलाेने सुवर्णपदक हुकले.

बाॅक्सिंग : हुसामुद्दीनची आगेकूच : भारताच्या गत स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बाॅक्सर माे. हुसामुद्दीनने ५७ किलाे वजन गटात शानदार विजयी सलामी दिली. त्याने सलामीला दक्षिण आफ्रिकेच्या एमजाेलेले डेयेयीला पराभूत केले. त्याने ५-० ने सामना जिंकला. यासह त्याला प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित करता आला. आता त्याचा सामना बांगलादेशच्या सलीम हुसेनशी हाेणार आहे.

श्रीहरी फायनलमध्ये दाखल
भारताच्या श्रीहरी नटराजने जलतरणात पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. त्याने शनिवारी पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्राेकची अंतिम फेरी गाठली. त्याने उपांत्य फेरीत सर्वात्तम वेळ नाेंदवली. त्याने ५४.४४ सेकंदांत निश्चित अंतर गाठले.

२०१८ मधील पुजारीच्या पदकाने प्रेरणा; फेब्रुवारीत इंटरनॅशनल चॅम्पियन ऑस्ट्रेलियातील २०१८ गाेल्ड काेस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेतील वेटलिफ्टर गुरुराज पुजारीच्या पदकाने मला खास प्रेरणा मिळाली. सकाळी ६ वाजेदरम्यान झालेला हा इव्हेंट मी पानाच्या दुकानात बसून पाहत हाेताे. त्यानंतर मीदेखील याच खेळामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या साेनेरी यशाने मला यासाठी खऱ्या अर्थाने प्राेत्साहन मिळाले. मी दिग्विजय व्यायामशाळेमध्ये वेटलिफ्टिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर यात मला माेठी प्रगती साधता आली, अशी प्रतिक्रिया संकेतने पदक जिंकल्यानंतर दिली. त्याने यंदाच्या सत्रात फेब्रुवारी महिन्यात सिंगापूर येथे इंटरनॅशनल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला हाेता.

टेटे : भारतीय महिला संघाची विजयी हॅट््ट्रिक साजरी
गत चॅम्पियन मणिका बत्राच्या नेतृत्वात भारतीय महिला टेबल टेनिस संघाने स्पर्धेत विजयी हॅट््ट्रिक साजरी केली. भारताने तिसऱ्या सामन्यात गयानाचा पराभव केला. भारताने गटातील तिसरा सामना ३-० ने जिंकला. भारताने सलामीला दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात फिजीचा पराभव केला हाेता. भारतीय महिला संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली.

जिम्नॅस्टिक : याेगेश्वर अंतिम फेरीसाठी पात्र, सैफ अपयशी
भारताच्या जिम्नॅस्ट याेगेश्वर सिंगने आता पदकाचा दावा मजबूत केला. त्याने शनिवारी आपल्या गटाची फायनल गाठली. यासह ताे ऑल अराउंड फायनल गाठणारा भारताचा एकमेव जिम्नॅस्ट ठरला. यादरम्यान मनमाडचा सैफ तांबाेळी आणि सत्यजित अपयशी ठरले. त्यांना अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला नाही. त्यांचा यासाठीचा प्रयत्न अपुरा ठरला.

क्रिकेट : भारत व पाकिस्तान महिला संघात आज लढत
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघ आता रविवारी स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेळणार आहे. यादरम्यान भारत व पाकिस्तान संघ समाेरासमाेर असतील. भारतीय संघाने गत ६ वर्षांपासूनची पाकविरुद्ध आपली विजयाची माेहीम कायम ठेवली आहे. आतापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये २००९ पासून आजतागत ११ सामने झाले. यात भारताने सर्वाधिक ९ सामने जिंकले.

बातम्या आणखी आहेत...