आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Team Will Take 6 10 Nets Bowlers To The UAE; Ranji Under 19 Players Included

आयपीएल:संघ 6-10नेट्स गोलंदाजांना यूएईला नेणार; रणजी-19 वर्षांखालील खेळाडूंचा समावेश, : द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा स्पर्धेसाठीचा मार्ग मोकळा, 1 सप्टेंबर रोजी पोहोचतील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संघ ६-१० नेट्स गोलंदाजांना यूएईला नेणार; रणजी-१९ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश'
  • फ्रँचायझींनी कोरोना टेस्ट सुरू केल्या, बंगळुरूची चाचणी यशस्वी

आयपीएलच्या फ्रँचायझी आपल्यासोबत नेट्स गोलंदाजांना घेऊन यूएईला जातील. चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्सने त्याला दुजोरा दिला. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी म्हटले की, सर्व काही चांगले राहिल्यास १० नेट्स गोलंदाज यूएईला जातील. यात रणजीसह २३ व १९ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश असेल. केकेआर १० आणि दिल्ली कॅपिटल्स ६ खेळाडूंना घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. केकेआरचे अकादमी प्रशिक्षक अभिषेक नायर गोलंदाजांची निवड करू शकतात. राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपल्या अकादमीतील गोलंदाजांना सोबत नेऊ शकतात. भारतीय १९ वर्षांखालील संघाचा सदस्य असलेल्या गोलंदाजांना शिकण्याची संधी मिळेल.

बीसीसीआय २२ ऑगस्टला घेईल अधिकृत माहिती
आयपीएलच्या तयारीसंबंधी माहिती घेण्यासाठी बीसीसीआय टीम अधिकृतरीत्या २२ ऑगस्ट रोजी दुबईला जाऊ शकते. यात अध्यक्ष बृजेश पटेल व हंगामी सीईओ हेमांग अमीन यांचा समावेश असेल. तेथे त्यांना सहा दिवस क्वाॅरंटाइन रहावे लागेल, त्यानंतर आपले काम करता येईल.

आरसीबी खेळाडूंची तीनदा चाचणी करेल
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडू व कर्मचाऱ्यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. अधिकाऱ्यानुसार फ्रँचायझी २२ किंवा २३ ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल. या आठवड्यात सर्व बंगळुरूला पोहोचतील. त्यानंतर त्यांना क्वाॅरंटाइन राहावे लागेल. खेळाडूंच्या एकूण तीन चाचण्या हाेतील.

द. आफ्रिकेचे खेळाडू १ सप्टेंबरला पोहोचतील
द. आफ्रिकेत लॉकडाऊन व विमान प्रवास बंद आहे. मात्र, द. आफ्रिकन सरकारने या महिन्याच्या अखेर विमान सेवा सुरु करणार आहे. सीएसकेने म्हटले की, फाफ डू प्लेसिस व लुन्गी एनगिडी १ सप्टेंबरला दुबईला पोहोचतील. ऑस्ट्रेलियाचा वॉटसन १० सप्टेंबरला पोहोचेल.

चिनी कंपन्यांना बाजूला करण्याचा दबाव नाही
बीसीसीआयवर चीनची गुंतवणूक असलेल्या भारतीय कंपन्या बाजूला करण्यासाठी दबाव नाही. पेटीएम व ड्रीम-११ मध्ये चीनचा पैसा आहे. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी प्रायोजक बायजूमध्येदेखील चीनची गुंतवणूक आहे. अधिकाऱ्याने म्हटले की, ‘सर्व कंपन्या भारतात आहेत, त्यांचे मालकदेखील भारतीय आहेत. त्यांना चिनी म्हणणे योग्य नाही.’

बातम्या आणखी आहेत...