आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The US Open Is The Largest Of The Four Grand Slams, Where Men And Women Play With Different Balls, With A Lighter Ball For Women Only.

वाद:चारही ग्रँडस्लॅममध्ये यूएस ओपन सर्वात मोठी, येथे महिला- पुरुष वेगवेगळ्या चेंडूने खेळतात, महिलांसाठीच हलका चेंडू

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिस खेळाडू इगा स्वातेकला महिला खेळाडूंकडून यूएस ओपनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूबाबत विचारले असता तिचे उत्तर होते की, मला वाटत होते चेंडू खूप खराब होता. मला माहीत आहे की अनेक खेळाडूंची याविषयी तक्रार असून त्यातील अनेक खेळाडू टॉप १० रँकिंगमध्ये सहभागी आहेत. यूएस ओपन एकमेव मोठी टुर्नामेंट आहे, जेथे पुरुष आणि महिला खेळाडू वेगवेगळ्या चेंडूंचा वापर करतात. स्वातेक म्हणाली, हलक्या चेंडूमुळे अनफोर्स्ड एरर अधिक होतात. विशेषत: तीन डावांनंतर हे चेंडू आणखी हलके होतात. शेवटी तुम्ही त्याद्वारे १७० किमी प्रतिघंटापेक्षा अधिक गतीने सर्व्हिस करू शकत नाही. कारण तुम्हाला चेंडू हलका असल्याची जाणीव झालेली असते. हे चेंडू खरेच खराब आहेत. याद्वारे आम्ही आणखी शक्तिशाली खेळ खेळूच शकत नाहीत.

फ्रेंच ओपनची रनरअप कोको गॉफ यांनी म्हटले की, यूएस ओपनच्या चेंडूतील फरक सहज लक्षात येतो. अमेरिकेची टॉप खेळाडू जेसिका पेगुला म्हणाली की, मला व्यक्तिश: हे चेंडू आवडत नाहीत. यामुळे अनेक डबल फॉल्ट होतात. आम्ही एक्स्ट्रा ड्यूटी बॉल्सनी का खेळत नाही. कौन्सिल यावर काम करत असेल अशी आशा बाळगते.

द्वितीय मानांकित राफेल नडाल १४ व्यांदा यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत, अार्यना सबालेंका व मुगुरजाही जिंकली स्पेनचा टेनिस खेळाउू राफेल नडाल १४ व्या वेळी यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत पोहोचला. चार वेळचा चॅम्पियन नडालने सलग दुूसरा डाव चार सेटमध्ये जिंकला. दुसरीकडे नडालने दुसऱ्या फेरीत इटलीच्या फेबियो फोगनिनीला २-६, ६-४, ६-२, ६-१ ने हरवले. आता त्याचा सामना फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटशी होईल. फ्रेंच खेळाडूने सर्बियाच्या मियोमिर केसमानोविचला ६-२, ५-४, ४-६, ६-४ ने हरवले. पुरुष सिंगल्समध्ये आंद्रे रुबलेव, ब्रेंडन नकाशिमा, कॅमरुन नोरी, जेनिक सिनरही तिसऱ्या फेरीत पोहोचले. तर महिला सिंगल्समध्ये सहावी मानांकित अार्यना सबालेंका, ९ वी मानांकित गरबाइन मुगुरजा, कॅरोलिना प्लिसकोवा व डेनियल कोलिंसही तिसऱ्या फेरीत गेली. ज्या चेंडूंचा वापर होत आहे ते क्ले कोर्ट किंवा इनडोअर कोर्टसाठी उपयोगी

महिला खेळाडूंसाठी विल्सन यूएस ओपन एक्स्ट्रा ड्यूटी चेंडूचा वापर करते. रेग्युलर ड्यूटी चेंडू एक्स्ट्रा ड्यूटी चेंडूच्या तुलनेत पातळ व हलका असतो. तो वेगवान असतो, परंतु एक्स्ट्रा ड्यूटीच्या तुलनेत कमी टिकतो. विल्सनही म्हणते की, रेग्युलर चेंडू मातीच्या किंवा इनडोअरसारख्या नरम पृष्ठभागासाठी बनवले जातात. एक्स्ट्रा ड्यूटी चेंडू कठीण कोर्टसाठी असतात. यूएस टेनिस असोसिएशनच्या मते, कोणत्या चेंडूचा वार करावा यासाठी अनेक फॅक्टर्सवर विचार केला जातो. असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही महिला आणि पुरुष प्रोफेशनल टूर, खेळाडूंचे कौन्सिल आणि आपल्या ब्रँड पार्टनरसोबत मिळून यावर काम करतो, जेणेकरून कोणता चेंडू वापरला जावा हे ठरवता येते.

बातम्या आणखी आहेत...