आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळ:महिला हॉकी संघास 25 लाखांची प्रोत्साहन रक्कम देणार दै. भास्कर

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले क्रीडा कौशल्य व संघर्षाच्या क्षमतेने प्रत्येक भारतीयात जोश संचारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचा देशाला अभिमान आहे. भारत आणि हॉकीसाठी हा अत्यंत भावनात्मक व ऐतिहासिक क्षण आहे. दैनिक भास्कर समूह महिला हॉकी संघाच्या प्रत्येक सदस्याला नमन करत आहे.

देशात हॉकीसाठी नव्या युगाची पायाभरणी करणाऱ्या महिला हॉकी संघाला भास्कर समूह प्रोत्साहन म्हणून २५ लाख रुपये देणार आहे. त्यातून महिला हॉकी संघाच्या १८ खेळाडू, मुख्य कोच, कोच, अॅनालिटिकल कोच, सायंटिफिक अॅडव्हायझर, फिजियो, व्हिडिओ अॅनालिस्ट व मसाजरसह प्रत्येक सदस्याला प्रत्येकी १-१ लाख रुपये दिले जातील. महिला हॉकी संघाने शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची जिद्द दाखवून स्त्रीशक्तीची प्रचिती िदली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आज आशेचा किरण आहे.

भास्कर समूहाचे मत आहे की भारतीय खेळांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहनामुळे खेळाडूंचे मनोबल वाढेल. यामुळे ते भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील.

बातम्या आणखी आहेत...