आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Women's Team Won 3 2 And The Men's Team 8 0, The Women's Fifth Semi final Appearance.

राष्ट्रकुल स्पर्धा:महिला संघाने 3-2 व पुरूष संघाने 8-0 ने विजय मिळवला, महिला पाचव्यांदा उपांत्य फेरीत

बर्मिंगहॅम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या पुरूष व महिला हॉकी संघांनी बुधवारी कॅनडाच्या संघाचा मात करत दुहेरी यश मिळवले. पहिल्या महिला संघाने कॅनडावर ३-२ ने विजय मिळवला. त्यानंतर पुरूष संघाने कॅनडावर ८-० ने एकतर्फी विजय साकारला. महिला संघाने पाचव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. संघाचा आता ऑस्ट्रेलियाशी ५ ऑगस्ट रोजी सामना होईल.

भारताच्या सलिमा टेटेने तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर संघासाठी पहिला गोल केला. नवनीत कौरने २२ व्या मिनिटाला गोल करून भारताला २-० ने आघाडीवर नेले. कॅनडाच्या ब्रायन स्टेअर्सने २३ व्या मिनिटाला गोल करत गोलफरक २-१ असा केला. तिसऱ्या सत्रात कॅनडाच्या हॅना ह्यूनने ३९ व्या मिनिटाला गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतरचौथ्या सत्रात ५१ व्या मिनिटाला भारताच्या लारेमसियामीने तिसरा गोल करत संघाला विजयी केले. दुसरीकडे, पुरुष हॉकीपटू हरमनप्रीत (७ व्या, ५४ व्या), आकाशदीप (३८ व्या, ६० व्या), अमित रोहिदास (१० व्या), ललित उपाध्याय (२० व्या), गुरजंत सिंग (२७ व्या) आणि मनदीप सिंग (५८ व्या) यांनी गोल केले. संघ गटात अव्वलस्थानी पोहोचला.

वेटलिफ्टिंग : लवप्रीत सिंगने उत्कृष्ट कामगिरीसह पदार्पणात जिंकले कांस्य
स्पर्धेत आतापर्यंत १३ खेळाडू मैदानात उतरले आणि ९ पदके जिंकत भारतीय वेटलिफ्टिरचे पदक जिंकण्याचे अभियान सुरूच आहे. लवप्रीत सिंगने १०९ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. तो प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला आहे. लुधियानाच्या टेलरचा मुलगा २४ वर्षीय लवप्रीतने एकूण ३५५ किलो वजन उचलले. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने स्नॅचमध्ये १६३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १९२ किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये त्याने राष्ट्रीय विक्रम केला. चालू स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे नववे पदक ठरले. कॅमरुनच्या न्याबेयेउने सुवर्ण व समोआच्या ओपेलोगेने रौप्य जिंकले.

ज्युदो : तुलिका मानने जिंकले रौप्यपदक; बॉक्सिंग : नीतू व हुसामुद्दीन उपांत्य फेरीत दुसरीकडे, भारताची ज्युदो खेळाडू तुलिका मानने ७८ किलो गटात रौप्यपदक पटकावले. चार वेळेची राष्ट्रीय चॅम्पियन २२ वर्षीय तुलिकाला अंतिम लढतीत स्कॉटलंडच्या साराह एडलिंग्टनकडून पराभवाचा सामना करावा लागला. त ज्युदोमधील भारताचे हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी सुशीलादेवीने रौप्य व विजयकुमारने कांस्य जिंकले आहे. दुसरीकडे, भारतीय बाॅक्सर नीतू ४८ किलो गटात आणि मोहंमद हुसामुद्दीने ५७ किलो गटात उपांत्य फेरी गाठली. या दोघांनी भारतासाठी दोन पदके निश्चित केली. दोन वेळेची युवा सुवर्ण विजेत्या २१ वर्षीय नीतूने नॉर्दर्न आयर्लंडच्या निकोल क्लाइडला हरवले. हुसामुद्दीनने नामिबियाच्या ट्रायागेन देवेलोला ४-१ ने मात दिली. त्याने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्क्वॉश : जोश्ना चिनप्पा-हरिंदर जोडी उपउपांत्यपूर्व फेरीत, सुनयना विजयी
भारतीय स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पा व हरिंदर पालसिंग संधूच्या मिश्र जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चिनप्पा-हरिंदर जोडीने श्रीलंकेच्या येहेनी कुरुप्पू-राविंदू लकसिरी जोडीला ८-११,११-४, ११-३ ने मात दिली. दुसरीकडे, सुनयना कुरविलाने एकेरीच्या प्लेट फायनलमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, लॉन बॉल्समध्ये लवली चौबे व नयनमणी जोडीने विजय मिळवला. भारतीय जोडीने हिना रेरेती-ऑलिव्हिया बकिंगहॅम जोडीचा २३-६ ने पराभव केला. त्याचबरोबर, पुरुष एकेरीमध्ये मृदुल बोरगोहाईने क्रिस लोकेला २१-५ ने हरवले.

बातम्या आणखी आहेत...