आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुपरस्टार लियाेनेल मेसीने अर्जेंटिना संघाला जग्गजेताचा बहुमान मिळवून देण्याची स्वप्नपूर्ती केली. लुसैल स्टेडियमवर ८८ हजार ९६६ फुटबाॅलप्रेमींच्या साक्षीने मेसीने पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना संघाला विजय मिळवून दिला. यासह अर्जेंटिना संघाने रविवारी फायनलमध्ये गतविजेत्या फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत केले.
यातून अर्जेंटिना संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. यापूर्वी अर्जेंटिना संघाने १९७८, १९८६ आणि आता २०२२ मध्ये विश्वचषक पटकावला. यादरम्यान गतविजेत्या फ्रान्स संघाला पराभवामुळे दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी फ्रान्स संघ २००६ मध्ये उपविजेता ठरला.
आता एकबापेने गाेलची हॅटट्रिक केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील रंगतदार अंतिम सामना निर्धारित वेळेत बराेबरीत राहिला हाेता. यादरम्यान फ्रान्ससाठी एमबापेने गाेल केले.
फ्रान्स शूटआऊट
1. किलियन एमबापे गोल
2. किंग्जले कोमान गोल होऊ शकला नाही
3. ऑरेलियन टचाॅमेनी गोल होऊ शकला नाही
4. रँडल मुआनी गोल
अर्जेंटिना शूटआऊट
1. लियोनेल मेसी गोल
2. पाउलो डिबाला गोल
3. लियान्ड्रो पारेदास गोल
4. गोंजालो मोंटियल गोल
फॅक्ट फाइल
१९७० नंतर प्रथमच एका वर्ल्डकपमध्ये दोघांची ९+ गाेलची मदत
मेक्सिकाे, 1970
कतार, 2022
- एमबापेचे वर्ल्डकप फायनलमध्ये ४ गोल झाले. तो पेले, वावा, हर्स्ट व झिदानला मागे टाकत फायनलमध्ये सर्वाधिक गोल करणारा एकमेव.
- अर्जेंटिनासाठी प्रत्येक मोठ्या फायनलमध्ये डी मारियाने गोल केला. ऑलिम्पिक, कोपा अमेरिकेनंतर वर्ल्डकपच्या फायनलमध्येही गोल.
तुल्यबळ संघांची कामगिरी
सामने 13
7 अर्जेंटिना विजयी
3 फ्रान्स विजयी
3 ड्रॉ
- अर्जेंटिना आणि फ्रान्स संघ चार वेळा विश्वचषकात समाेरासमाेर आले हाेते. यात अर्जेंटिनाने तीन विजय संपादन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.