आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The World's Largest Basketball League NBA Will Be Held For The First Time In The History Of 74 Years Without Fans, All Matches In One City

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात मोठी बास्केटबॉल लीग एनबीए ७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विनाप्रेक्षक; एकाच ठिकाणी सामने

न्यूयॉर्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनबीए खेळाडूंची खेळण्यापूर्वी दोन वेळा कोविड-१९ चाचणी होईल; ४८ तासांचे वैयक्तिक आयसोलेशन आवश्यक
  • ७३ गेम बाकी, काही संघांचे ८ आणि काहींना १० सामने खेळायचे आहेत
  • ३ सामने एकाच वेळी हाेतील, एका संघात ३७ जणांना मिळेल प्रवेश

जगातील सर्वात मोठी बास्केटबॉल लीग एनबीए पुनरागमनास तयार आहे. आयोजकांनी कोविड-१९ च्या संपूर्ण सुरक्षेसह अमेरिकेच्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनला (एनबीए) सुरू करण्याचे नियोजन केले. २२ दिग्गज संघांत खेळवण्यात येणारी लीग ३१ जुलैपासून सुरू होईल आणि १२ ऑक्टोबरपूर्वी त्याची फायनल खेळवली जाईल. एनबीएच्या ७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात येतील. एका ठिकाणी सर्व संघ आपापले सामने खेळतील, असे पहिल्यांदा होईल. फ्लोरिडाच्या (ऑरलँडो) वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट त्यासाठी निश्चित केले आहे. सर्व संघ येथे सराव करतील, सर्व सामने खेळतील व संपूर्ण सत्र याच ठिकाणी राहतील. आतापर्यंत संघांनी ६५-६६ सामने खेळले आहेत, ७२-७३ सामने बाकी आहेत. काही संघांना ८, तर काहींना १० सामने खेळायचे आहेत. एनबीएला अाशा आहे की, नवे सत्र (२०२०-२१) वेळेवर सुरू होईल.

खेळाडूंना एकमेकांच्या खोलीत जाण्याची परवानगी नाही
खेळाडूंना डिस्ने वर्ल्डमध्ये पोहोचल्यानंतर वैयक्तिक आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. खेळाडू ४८ तास आयसोलेशनमध्ये असतील, जोपर्यंत त्यांच्या दोन कोविड-१९ चाचण्या निगेटिव्ह येत नाही ताेपर्यंत खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या खोलीत जाण्याची परवानगी असणार नाही. खेळाडूंना त्याच तीन हॉटेलमध्ये राहावे लागेल, ज्या त्यांच्यासाठी राखीव आहेत.

पहिल्या रांगेत मास्क अनिवार्य
{सर्व खेळाडूंना मास्क घालणे बंधनकारक आहे. केवळ जेवताना व खोलीत मास्क काढू शकतील. बाहेर कोणत्याही प्रकारची कृती करण्याची परवानगी नाही. जे खेळाडू, रेफरी परिसरात पहिल्या रांगेत असतील, त्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल. यंदा एनबीए सामन्यादरम्यान चाहत्यांना प्रवेशबंदी असेल. संघातील खेळाडू गॅलरीमधून सामना पाहू शकतील. माध्यमे, संघाचे अधिकारी, लीगचे व्यक्ती व प्रायोजकांना येण्यास परवानगी आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पाळावे लागेल.
काही सामन्यांचे थेट प्रक्षेपण
{चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे, यंदा सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही. वेळ कमी व एनबीएचे दिवसात ३ ते ४ सामने होतील. त्यामुळे काहीच सामन्यांचे थेट प्रक्षेपण होऊ शकेल. जर कोणता खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला १४ दिवस आयसोलेट केले जाईल. पुनरागमनासाठी कार्डियाक चाचणी पास करावी लागेल. जर कोणता खेळाडू पॉझिटिव्ह आढळला व ताे खेळू शकणार नसेल तर त्याला प्रोटेक्टेड स्टेटस दिले जाईल. त्याचे वेतन कापणार नाही.

संघासोबत असेल एक आचारी
{सर्व संघ आपल्या सोबत एक आचारी ठेवेल आणि संघाची खाणावळ २४ तास खुली राहील. खेळाडू कधीही जेवण करू शकतील. त्यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत जेवण्याची परवानगी असेल. ते फूड अॅपद्वारे आपल्या खोलीत जेवण मागवू शकतील. सर्वांना डिस्ने मॅजिक बँड दिला जाईल. हा त्यांच्या हॉटलेमध्ये जाणारा पास असेल व त्याद्वारे त्यांची माहिती ठेवण्यात येईल. परिसरात केवळ एका संघातील ३७ लोकांनाच परवानगी मिळेल. संघांना मनोसपोचार तज्ञ सोबत ठेवावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...