आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The World's Oldest Ultra Marathon; Target To Finish In 12 Hours, 220 Marathoners From India Participated

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात जुनी अल्ट्रा मॅरेथाॅन; 12 तासांत पूर्ण करण्याचे टार्गेट, भारताचे 220 मॅरेथाॅनर सहभागी

एकनाथ पाठक | औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वर्षांच्या माेठ्या ब्रेकनंतर आता धावपटू नव्या उत्साहात लांब पल्ल्याच्या मॅरेथाॅनमध्ये सहभागी हाेत आहे याचाच प्रत्यय दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या काॅमरेड मॅरेथाॅनदरम्यान आला. जगातील सर्वात माेठी आणि जुनी असलेल्या या अल्ट्रा मॅरेथाॅनमध्ये जगभरातील जवळपास १३ हजार ५०० धावपटू सहभागी झाले हाेते. यामध्ये भारतातून २२० मॅरेथाॅनरने सहभाग नाेंदवला हाेता. मात्र, प्रत्यक्षात १८० जण धावले. तसेच महाराष्ट्रातूनही १२ पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला. यात औरंगाबादच्या डाॅ. अजित घुलेंसह नितीन चाैधरी आणि माधुरी निमजे यांचा समावेश हाेता. त्यांनी ही आव्हानात्मक मानली जाणारी मॅरेथाॅन पूर्ण केली.

दर्बन ते पीटरमेरिट्जबर्गदरम्यान ही मॅरेथाॅन आयाेजित करण्यात आली हाेती. ही मॅरेथाॅन अप आणि डाऊन अशा दाेन गटांत दरवर्षी राेटेशन पद्धतीने आयाेजित केली जाते. यंदा २०२२ मध्ये ही मॅरेथाॅन डाऊन हाेती. त्यामुळे सहभागी खेळाडूंनी ९० किमीचे अंतर गाठण्यासाठी पहाटे ५ वाजेपासून धावण्यास सुरुवात केली. यादरम्यान पहाटे कडाक्याची थंडी हाेती. ही आव्हानात्मक मानली जाणारी मॅरेथाॅन १२ तासांत पूर्ण करण्याचे टार्गेट असते. यंदाच्या या मॅरेथाॅनमध्ये जगभरातील धावपटूंनी सहभाग नाेेंदवला हाेता.

बातम्या आणखी आहेत...