आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षातील शेवटची टेनिस ग्रँडस्लॅम यूएस ओपन, ज्यात यंदा अनेक विक्रम नोंदवले गेले. आर्थर अॅश स्टेडियवर महिला एकेरीत युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. १८ वर्षीय एमा राडुकानू आणि १९ वर्षीय लेलाह अॅनी फर्नांडेझने किताबी लढतीदरम्यान अनेक धक्कादायक निकाल नोंदवले. अनेक अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. रविवारी जेव्हा दोघी फ्लशिंग मिडोजच्या बिली जीन किंग राष्ट्रीय टेनिस सेंटरवर फायनलमध्ये उतरतील, तेव्हा विजय कुणाचाही होवो, इतिहास रचला जाईल. ग्रँडस्लॅमच्या दोन्ही युवा स्टार या स्पर्धेच्या माध्यमातून आता जगभरात प्रसिद्ध होतील. पाहूयात या दोघींचा आतापर्यंतचा प्रवास...
एमा राडुकानू : : कॅनडात जन्मलेल्या या ब्रिटिश खेळाडूच्या घरात कुणाचाही खेळाशी संबंध नाही, अँडी मरेचे सासरे तिचे प्रशिक्षक
इंग्लंडची एमा राडुकानू आता टेनिसच्या जगात परिचित नाव बनले. कॅनडाच्या टोरंटोमध्ये १३ नोव्हेंबर २००२ रोजी जन्मलेली राडुकानू जेव्हा दोन वर्षांची होती, तेव्हा तिचे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. वयाच्या पाचव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात करणारी राडुकानू अभ्यासातही हुशार आहे. तिला गणितात अ+ श्रेणी व अर्थशास्त्रात अ श्रेणी मिळत असे. तिच्या कुटुंबात कुणाचाही खेळाशी संबंध नाही. राडुकानूचे वडील इयान रोमानियाचे व आई रेनी चीनची आहे. दोघे आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात काम करतात. राडुकानूने सोशल मीडियावर लिहिले की, ‘लंडन, टोरंटो, बुखारेस्ट, शेनयांग ही तिचे घर, जन्मस्थान व तिच्या आई-वडिलांचे शहरे आहेत.’ ती आई-वडील दोघांची परंपरा जपते. ती वर्षातील २ वेळा बुखारेस्टला (रोमानिया)जाते, कारण आजीच्या हाताचे जेवायला आवडते. तिला टेबल टेनिस खेळायला खूप आवडते. ती नानजिंगमधील चीनच्या टेबल टेनिस अकादमीमध्ये खेळण्यासाठी जात होती. राडुकानू मेंडेरिन बोलू शकते. ती प्रत्येक वर्षी शेनयांगला जाण्याचा प्रयत्न करते. तिने तेथे टेनिस स्कूलमध्ये सराव केला. रोमानियाची सिमोना हालेप व चीनची ली ना तिची प्रेरणास्थान आहे. जागतिक क्रमवारीतील १५० व्या स्थानावरील राडुकानूचे प्रशिक्षकदेखील उच्च दर्जाचे आहेत. तीन वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन अँडी मरेचे सासरे निगेल सियर्स तिचे प्रशिक्षक आहेत. राडुकानूने २०१८ मध्ये व्यावसायिक करिअरला सुरुवात केली.
लेलाह अॅनी फर्नांडेझ : उंची केवळ ५ फूट ५ इंच आहे, इतर खेळाडूंच्या तुलनेत खूप कमी; शिक्षकांचे रागावणे प्रोत्साहन ठरले
आ णखी एक युवा स्टार आहे, कॅनडाची लेलाह अॅनी फर्नांडेझ. स्थलांतरितांचे मूल फर्नांडेझचा जन्म ६ सप्टेंबर २००२ रोजी मॉन्ट्रियल येथे झाला. वडील जॉर्ज फर्नांडेझ इक्वेडोेरचे होते. ते माजी फुटबॉलपटू होते आणि आई इरेने फिलिपाइन्सची आहे. फर्नांडेझची छोटी बहीण जोलीदेखील टेनिस खेळते. बालपणी फर्नांडेझ फुटबॉल, व्हॉलीबॉल व कधी कधी मैदानी खेळात सहभागी होत होती. मात्र, वयाच्या सातव्या वर्षी टेनिसवरील प्रेम वाढले. ती बेसमेंटच्या भिंतीवर तासन्तास शॉट मारण्याचा सराव करत होती. वयाच्या १०-११ व्या वर्षी फर्नांडेझला तिच्या शिक्षकांनी रागावून व्यावसायिक टेनिसपटू बनणे सोडून अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र, शिक्षकांचे रागावणे तिच्यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट ठरली. तिने म्हटले की, ‘त्यांचे शब्द नेहमी डोक्यात फिरत असत. ते मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.’ वडील जॉर्ज फर्नांडेझ तिचे प्रशिक्षक आहेत, मात्र त्यांनी कधीही टेनिस खेळलेले नाही. फर्नांडेझची उंची केवळ ५ फूट ५ इंच आहे, जी टेनिससारख्या खेळासाठी कमी आहे. ती अापल्यापेक्षा उंच खेळाडूविरुद्ध ताकदीचा उपयोग करते. बेल्जियमची खेळाडू जस्टिन हेनिनची चाहती असलेली फर्नांडेझ साेशल मीडियावर तिचे व्हिडिओ पाहून सराव करते. कॅनडाची बास्केटबॉल स्टार स्टीव नॅशसह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन हुडो सोशल मीडियावर तिला पाठिंबा देतात.
१८ वर्षीय एमा राडुकानू आणि १९ वर्षीय लेलाह अॅनी फर्नांडेझची गोष्ट..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.