आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Third Consecutive Series Defeat Over India, T20: Today India south Africa Third Match; Launch Evening From 7.00 P.m.

टी-20 क्रिकेट:भारतावर सलग तिसऱ्या मालिका पराभवाचे सावट, टी-20 : आज भारत-द. आफ्रिका तिसरा सामना; प्रक्षेपण सायं. 7.00 वाजेपासून

विशाखापट्टणम20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलगच्या अपयशामुळे अडचणीत सापडलेल्या यजमान भारतीय संघावर आता सलग तिसऱ्या मालिका पराभवाचे सावट निर्माण झाले. टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतील सलग दोन सामने गमावले. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मंगळवारी झंुजणार आहेत. विशाखापट्टणम येथील मैदानावर हे दोन्ही संघ आज समाेरासमाेर असतील. भारतासाठी हा सामना ‘करा वा मरा’ असा आहे. यातील पराभवाने टीम इंडियावर घरच्या मैदानावर मालिका गमावण्याची नामुष्की आेढावणार आहे. दुसरीकडे बावुमाच्या नेतृत्वात फाॅर्मात असलेला दक्षिण आफ्रिका संघ आता भारतावर मालिका विजयाची हॅट््ट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी आफ्रिका संघाने वनडे (३-०) आणि कसाेटी (२-१) मालिका जिंकल्या आहेत. आफ्रिका संघ आता यजमान भारताविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे.

बातम्या आणखी आहेत...