आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेलकाता नाइट रायडर्सच्या युवा फलंदाज रिंकू सिंगची पाच चेंडूंत पाच षटकारांची आतषबाजी आणि पंजाब किंग्जच्या कर्णधार शिखर धवनची नाबाद ९९ धावांच्या खेळीने यंदाचे १६ व्या सत्रातील आयपीएल आता अधिकच लक्षवेधी झाले आहे. यंदाच्या सत्रातील आयपीएलचे आतापर्यंत जवळपास १/५ सामने झाले आहेत. आता याच सामन्यांदरम्यान धावांचा पाऊस पडला. यामुळे यंदाचे आयपीएल हे सर्वात हायस्काेअरिंग सत्र हाेण्याच्या वाटेवर आहे. कारण, यंदा प्रतिषटक रनरेटमध्ये प्रचंड वाढ हाेताना दिसत आहे. तसेच पाॅवरप्लेमध्ये युवा फलंदाज हे तुफानी खेळीतून धावांचा पाऊस पाडत आहेत. १४ सामन्यांत यंंदा ८.३६ रन प्रतिषटक नाेंद झाले आहेत. यादऱ्यान म्हणजेच २०१८ मधील विक्रमाला मागे टाकले. यादरम्यान ८.६४ ची नाेंद हाेती.
१९०+ च्या स्काेअरवर जय-पराजय निश्चित
१०० धावांचा आकडा झटपट गाठला जाताेय सध्याच्या आयपीएलमध्ये वेगवान स्काेअरिंग रेटचा अंदाज हा आतापर्यंतच्या २८ डावातील तुफानी खेळीतून बांधला जात आहे. यादरम्यान ९ संघांनी झटपट १०० धावसंख्येचा आकडा गाठला आहे. म्हणजेच यासाठी ६० वा ७२ चेंडूंत संघांचा स्काेअर १०० वर राहिला आहे. यामुळे हे आतापर्यंतचे सर्वाधिक वेगवान ठरले आहे. २०१८ मध्ये १०० धावांसाठी ७ वेळा १२ षटके खेळावी लागली. यंदा हा आकडा १० षटकांतच गाठला जात आहे.
आतापर्यंत आठ वेळा १९०+ धावसंख्येची नाेंद १९०+ चा स्काेअर हा विजयाचा काैल देणारा ठरत आहे. यामुळे १४ सामन्यांदरम्यान आठ वेळा प्रथम फलंदाजी करताना १९०+ धावसंख्या असलेल्या संघांना विजय साजरा करता आला. फक्त काेलकाता संघानेच माेठे लक्ष्य गाठून गुजरात संघावर मात केली. यंदा ८ वेळा १९०+ स्काेअर झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.