आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिरवाईने नटलेले टेनिस कोर्ट, स्ट्राबेरी क्रीम आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यावरील खेळाडू हीच जगातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अचूक आेळख आहे. मात्र, आता हीच विम्बल्डन स्पर्धा यंदा नव्या स्वरूपात खेळवली जाणार आहे. येत्या साेमवारपासून सत्रातील या तिसऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान अनेक वर्षांपासूनची रविवारी सामने न खेळवण्याची परंपरा यंदा मात्र खंडित होणार आहे. यंदाच्या रविवारीही सामने खेळवले जातील. खेळाडूंना सेंटर व आणि मुख्य शाे कोर्टवरही सराव करता येणार आहे. यंदा ही स्पर्धा पहिल्यांदाच स्विस किंग राॅजर फेडररच्या अनुपस्थितीत खेळवली जाणार आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन व बेलारूसच्या टेनिसपटूंवर बंदी आहे. त्यामुळेच रँकिंग गुण स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना मिळणार नाहीत.
मेदवेदेव,ज्वेरेवला, आर्यंना सबालेंका, अझारेंका मुकणार जागतिक क्रमवारीत नंबर वन मेदवेदेव व दुसऱ्या स्थानावरील अलेक्झेंडर ज्वेरेवला यंदा या स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळेच रशिया आणि बेलारूसच्या टेनिसपटूंवर आयाेजकांनी बंदी घातली आहे. त्यामुळे आर्यना सबालेंका व व्हिक्टाेरिया अझारेंकाही या स्पर्धेला मुकणार आहे.
सेंटर कोर्टचे १०० व्या वर्षांत पदार्पण; जल्लोषात सेलेब्रेशन विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे सेंटर कोर्ट आता १०० व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता या कोर्टचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी खास डेकोरेशन करण्यात आले आहे. आयाेजकांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाचे या कोर्टवरील सामने हे चाहत्यांसाठी खास पर्वणी असणार आहे.
प्रतिष्ठित सेंटरवर सरावाची संधी; खेळाडूंना मोठा फायदा मानांकित खेळाडूंना आता सेंटर व मुख्य शाे कोर्टवर सराव करण्याची संधी देण्यात आली. यापूर्वी सरावासाठी फक्त ग्रास कोर्टवरच परवानगी दिली जात होती. मात्र, आता याच बदल करण्यात आला. या निर्णयाचे खेळाडूंनी स्वागत केले. हा निर्णय खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया कॅमरून नाेरीने दिली.
पहिल्यांदाच सलग १४ दिवस रंगणार मॅरेथाॅन स्पर्धा; ब्रेक स्थगित
आतापर्यंत विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान येणाऱ्या रविवारी सामन्यांना ब्रेक दिला जात होता. रविवारी सामने खेळवले जात नव्हते. मात्र, आता ही परंपरा खंडित करण्यात आली. यंदा ही स्पर्धा सलग १४ दिवस अविरत खेळवली जाणार आहे. यादरम्यानचा ब्रेक हा रद्द करण्यात आला. याच मॅरेथाॅन स्पर्धेचा मोठा फायदा ब्राॅडकास्टरला होणार आहे. याशिवाय चाहत्यांनाही सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वांनी आतापर्यंत स्वागत केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.