आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Three Players In Test Cricket, Chetan Chauhan, Niroshan Dickwella, Shane Warne

कसोटी क्रिकेटमधील असे तीन खेळाडू:ज्यांना शतक करता आले नाही पण कसोटीत धावांचा विक्रम रचला

स्पोर्ट्स डेस्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसोटी क्रिकेट कोणत्याही फलंदाजाच्या संयमाची परीक्षा घेते. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर फलंदाजांना संयमाने खेळावे लागेल. आतापर्यंत असे अनेक फलंदाज झाले आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत आणि त्यांनी खूप धावाही केल्या आहेत. या फलंदाजांनी अनेक दिग्गज गोलंदाजांसमोर धावा केल्या आणि त्यांचे चेंडू उत्तम प्रकारे खेळले.

कसोटी क्रिकेटला खरे क्रिकेट म्हणतात. या फॉरमॅटमध्ये फलंदाज तासनतास क्रीजवर राहतो. त्यांच्या बॅटमधून धावा येत नसल्या तरी चेंडू सोडून बचाव करण्याची कला त्यांना अवगत असती. त्यामुळेच ते कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होतात. स्वतःचे रेकॉर्ड रचतात.

या खेळाडूंची देखील कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी

राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, जॅक कॅलिस, जस्टिन लॅंगर, वसीम जाफर आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे खेळाडूंनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या खेळाडूंनीही कसोटी क्रिकेटमध्ये अनेक शतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये असेही काही फलंदाज झाले आहेत ज्यांनी शतक न करताही खूप धावा केल्या आहेत. चला तर आज आपण कसोटी क्रिकेटमधील टॉप 3 फलंदाजांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी या फॉरमॅटमध्ये शतक न करता सर्वाधिक धावा केल्या

1) चेतन चौहान यांची कामगिरी
माजी भारतीय खेळाडू चेतन चौहान तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेतन चौहान ऑफ ब्रेकही गोलंदाजी करायचा. त्याने 1969 ते 1981 या कालावधीत आपल्या कारकिर्दीत एकूण 40 कसोटी सामने खेळले आणि दोनदा नाबाद राहताना 2,084 धावा केल्या. आपल्या कसोटी कारकिर्दीत चेतन चौहानने 16 अर्धशतके झळकावली. पण त्याला एकही शतक झळकावता आले नाही. एकदा तो शतक करण्याच्या अगदी जवळ आला होता पण 97 धावांवर बाद झाला. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्याही होती.

2. निरोशन डिकवेला (श्रीलंका)

या यादीत श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 53 सामने खेळले असून 94 डावात 31.60 च्या सरासरीने 2750 धावा केल्या आहेत. डिकवेलाला त्याच्या कारकिर्दीत अजून एकही कसोटी शतक झळकावता आलेले नाही. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 धावा आहे पण तो त्याच्या पहिल्या शतकाची वाट पाहत आहे.3. शेन वॉर्न या यादीत समावेश
ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्न देखील यांचा या कसोटी क्रिकेटमध्ये शतक न करता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून रेकॉर्ड आहे. शेन वॉर्न हे त्यांच्या काळातील दिग्गज गोलंदाज होते आणि त्यावेळी ऑस्ट्रेलियाला ज्या प्रकारची फलंदाजी मिळाली होती. त्यामुळे त्यांना फलंदाजीच्या फार कमी संधी मिळाल्या होत्या. असे असूनही शेन वॉर्न यांनी 145 सामन्यांच्या 199 डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली, मात्र यादरम्यान त्यांनी एकही शतक झळकावता आले नाही. वॉर्न यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 3154 धावा केल्या आणि 12 अर्धशतके केली. शेन वॉर्नरचे कसोटी शतक अवघ्या 1 धावाने हुकले. त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या 99 धावा आहे.

बातम्या आणखी आहेत...