आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंचा दैनंदिन भत्ता अतिशय तुटपुंजा आहे. सध्याच्या महागाईच्या काळात तो पुरत नाही. त्यामुळे खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी बुधवार (१ जून) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, खेळाडूंना आजघडीला केवळ ३०० रुपये भत्ता मिळतो. यात चहा-नाष्टा, दोन वेळचे जेवण हे विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा दैनंदिन भत्ता ३०० रुपयांवरून १००० रुपये करावा. मुंबई विद्यापीठातील खेळाडूंना १००० रुपये दैनंदिन भत्ता दिला जातो. आंतरविद्यापीठ स्पर्धेपूर्वी विद्यापीठाच्या खेळाडूंचे-संघाचे स्पर्धेपूर्व प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. या शिबिरातील खेळाडूंना केवळ एकाबाजूचा प्रवास भत्ता दिला जातो आणि एका बाजूचा प्रवास खर्च खेळाडूला स्वखर्चातून करावा लागतो. ही चुकीची बाब आहे. खेळाडूंना दोन्हीकडील प्रवास भत्ता देण्यात यावा. तसेच शिबिरात सहभागी खेळाडूंना दैनिक भत्ता २०० दिल्या जातो, तो वाढवून ५०० रुपये करावा. त्याचबरोबर, स्पर्धेदरम्यान आपल्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ट्रॅक सूट माप योग्य नसते. यापुढे त्यांना चांगल्या दर्जाचे व अचूक मापाचे ट्रॅकसुट देण्यात यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.