आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Deepak Chahar To Tie The Knot Today, Photos Of Mehndi Music Ceremony With Jaya Came In Front,

दीपक चहर आज अडकणार विवाहबंधनात:जयासोबतचे मेहंदी-संगीत सेरेमनीचे फोटो आले समोर,धोनी-कोहली लग्नात लावणार हजेरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आज त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्न करणार आहे. बुधवारी सकाळी त्यांचा हळदी सोहळा पार पडला. रात्री 9 वाजता हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यामध्ये दीपक आणि जयाच्या कुटुंबासह धोनी, कोहली यांचाही सहभाग असू शकतो.

आग्रा येथील हॉटेल JP पॅलेसमध्ये या वेगवान गोलंदाजाच्या लग्नाचे विधी पार पडले. मंगळवारी मेहंदी झाली. त्यानंतर संगीत सेरेमनीमध्ये या जोडप्याची देसी स्टाइल पाहायला मिळाली. समारंभात दीपक चहर, जया भारद्वाज आणि मालती चहर यांनी 'अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिये' या गाण्यावर नृत्य केले.

फोटो पहा…

जया भारद्वाज आणि दीपक चहर एकत्र.
जया भारद्वाज आणि दीपक चहर एकत्र.

3 जून रोजी दिल्लीत रिसेप्शन, 600 पाहुणे आमंत्रित

दीपक चहरच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 600 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुण्यांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी, माजी सहकारी सुरेश रैना, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांसारख्या अनेक स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

जया आणि दीपक संगीतात एकत्र नाचताना
जया आणि दीपक संगीतात एकत्र नाचताना

शाही मेजवानीचे आयोजन

विवाह सोहळ्यानिमित्त शाही मेजवानीही ठेवण्यात आली आहे. यामध्ये आग्राच्या खास चाट सहित, हातरसची रबडी बनवण्यात आली आहे. याशिवाय थाई, इटालियन खाद्यपदार्थांसह अवधी, मुघलाई, पंजाबी, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचाही आस्वाद पाहुण्यांना घेता येणार आहे.

जया भारद्वाज मेहंदी लावताना.
जया भारद्वाज मेहंदी लावताना.

दुखापतीमुळे IPL-15 मधून बाहेर

दीपक चहर पाठीच्या दुखापतीमुळे IPL च्या चालू हंगामातून बाहेर पडला होता. 30 वर्षीय गोलंदाजाने 63 IPL सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी 27 सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत.

दीपक चहरने यूएईमध्ये IPL सामन्यादरम्यान जयाला प्रपोज केले होते.
दीपक चहरने यूएईमध्ये IPL सामन्यादरम्यान जयाला प्रपोज केले होते.

गेल्या वर्षी IPL सामन्यात केले होते प्रपोज

चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला IPL सामन्यादरम्यान त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केले होते. हा सामना UAE मध्ये खेळला गेला. जया ही दीपकची बहीण मालतीची मैत्रिण आहे. तिने या दोघांची भेट घडवून आणली होती. आधी मैत्री झाली ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. जया मूळच्या बाराखंबा, दिल्लीच्या रहिवाशी आहेत. ती दिल्लीतील एका टेलिकॉम कंपनीत काम करते आणि तिने एमबीए केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...