आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Today Al Classics At Wankhede; Mumbai Chennai Teams Clash, Thrill Of Double Header Today; Rajasthan Delhi Match In Guwahati

आयपीएल:वानखेडेवर आज अल क्लासिकाे; मुंबई-चेन्नई संघांत महामुकाबला, आज डबल हेडरचा थरार; गुवाहाटीत राजस्थान-दिल्ली सामना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईचे वानखेडेवर वर्चस्व; सात वेळा चेन्नईचा फडशा

आयपीएलमधील सर्वात यशस्वी मानला जाणारा पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चार वेळचा किताब विजेता चेन्नई सुपरकिंग्ज आता शनिवारी समाेरासमाेर असणार आहेत. यंदाच्या आयपीएलध्ये या दाेन्ही संघांचा सामना शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएलमधील अल क्लासिकाे मानल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबई आणि चेन्नई संघ सांयकाळी ७.३० वाजेपासून समाेरासमाेर असणार आहेत. यजमान मुंबई इंडियन्स संघाचे आपल्या घरच्या मैदानावर वर्चस्व अबाधित राहिले आहे. यामुळे आताही हेच निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राेहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने कंबर कसली आहे. यामुळे आता धाेनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाला वानखेडेवरील आपली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी माेठी कसरत करावी लागणार आहे. कारण, मुंबई संघाने आतापर्यंंत आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर सात वेळा चेन्नई संघाचा फडशा पाडला आहे. सध्या हे दाेन्ही संघ सुमार खेळीमुळे अडचणीत सापडलेले आहेत. मुंबईला गत ५ पैकी तीन सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. तसेच चेन्नईचा ५ सामन्यांत चार वेळा पराभव झाला. गत सत्रामध्ये हे दाेन्ही संघ तळात हाेते.

धाेनीचा एमसीएकडून ‘विजयी षटकाराने’ गाैरव : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने शुक्रवारी माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचा वानखेडेवरील २०११ वि‌श्वचषकातील विजयी षटकाराचा फाेटो देऊन गाैरव करण्यात आला.

हाय स्काेअरिंगची आशा; चेन्नईला पेसरची चिंता : मुंबईच्या हाेमग्राउंड वानखेडेवर धावांचा पाऊस पडताे. यामुळे या ठिकाणी टी-२० चे हाय स्काेअरिंग सामने झाले आहेत. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावे १८५ धावसंख्येची नाेंद झालेली आहे. आता चेन्नई पेसर्समुळे चिंतेत आहे. टीमचे तुषार देशपांडे आणि राजवर्धन हंगरगेकर फाॅर्मात आहेत.

राजस्थान-दिल्ली सामना रंगणार
गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर यजमान राजस्थान राॅयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांत सामना रंगणार आहे. हे दाेन्ही संघ ३.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. राजस्थान संघाच्या नावे दाेन सामन्यांत प्रत्येकी एक विजय व पराभवाची नाेंद आहे. दिल्ली संघाला विजयाचे खाते उघडता आले नाही.

टाॅपले बाहेर; परनेलला संधी
बंगळुरू
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा रिस टाॅपले आता यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याला लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळताना गंभीर ‌दुखापत झाली. या खांद्याच्या दुखापतीमुळे आता त्याला आयपीएलमधूनच बाहेर पडावे लागले. बंगळुरू संघाने यंदाच्या सत्रासाठी टाॅपलेसाेबत १.९ काेटी रुपयांत करार केला हाेता. मात्र, त्याला हे सत्र पूर्ण करता आले नाही. आता बंगळुरू संघाने त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गाेलंदाज वेन परनेलला संधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आफ्रिकेचा हा गाेलंदाज २०१४ नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानावर उतरणार आहे.