आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत उपविजेता क्राेएशिया संघ आता यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेमध्ये तिसऱ्या स्थानाचा बहुमान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी क्राेएशियाच्या अनुभवी दिग्गजांना आज शनिवारी युवा सुपरस्टार असलेल्या माेराेक्काे संघाच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर क्राेेएशिया व माेराेक्काे यांच्यात सामना रंगणार आहे. हे दाेन्ही संघ रात्री ८.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. गत उपविजेत्या क्राेएशिया संघाचा फायनल गाठण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. मेसीच्या अर्जेंटिना संघाने रंगतदार उपांत्य सामन्यामध्ये गत उपविजेत्या क्राेएशियाचा पराभव केला. माेराेक्काेला फ्रान्सविरुद्ध पराभवाला सामाेरे जावे लागले.
प्लेअर्स टू वॉच: क्रोएशिया| ३७ वर्षीय लुका माेड्रिच हा आपला शेवटच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाेत्तम खेळीतून संघाला तिसरे स्थान मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे.
मोराेक्को| संघाचा गाेलरक्षक यासिन बाेनाेऊ सध्या फाॅर्मात आहे. त्याच्याकडून संघाला सर्वाेत्तम कामगिरीची आशा आहे.
दाेन्ही संघांनी खेळले प्रत्येकी ६ सामने; जायबंदीने अडचणीत विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेमध्ये क्राेएशिया व माेराेक्काे संघांनी प्रत्येकी ६ सामने खेळले. सर्वाेत्तम खेळी करता या दाेन्ही संघांना उपांत्य फेरीचा पल्ला गाठता आला. दाेन्ही संघ जायबंदी खेळाडूंची संख्या वाढत असल्याने अडचणीत सापडले आहेत. क्राेएशिया संघाचा मिडफील्ड अधिकच मजबूत मानला जाताे. मात्र, याच फळीतील आघाडीचा मिडफील्डर मार्सेलाे ब्राेजाेविक दुखापतीने त्रस्त आहे. माेराेक्काे संघाचा कर्णधार राेमेन सेस, नाएफ एगुएर्ड व नुस्सर मजराेई सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे हे तिघेही आता क्राेेएशियाविरुद्ध सामन्यात खेळू शकणार नाही.
स्ट्रॅटेजी कॉर्नर दोन्ही संघ ४-३-३ याच फाॅर्मेशनने खेळण्याच्या तयारीत आहेत.
कोच Vs कोच क्रोएशिया : काेच ज्वाटकाे डेलिच म्हणाले की, आम्ही फिट खेळाडूंनाच आता मैदानावर खेळवणार आहाेत. छाेटी दुखापतही ही सर्वांसाठी धाेकादायक आहे. त्यामुळेच आम्ही परिस्थितीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेणार आहाेत.
माेराेक्काे : माेराेक्काेचे प्रशिक्षक वेलिड रेग्रागुई यांनी तिसरे स्थान पटकावण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आम्ही कसून सराव केला आहे. याशिवाय क्राेएशियावर मात करण्यासाठी खास डावपेचही आखले आहेत, असेही त्यांनी सांगितले. यासह विजयाचा दावा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.