आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतार येथील फिफाच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम चार संघ निश्चित हाेण्यासाठीच्या लढतींना आज शुक्रवारपासून सुुरुवात आहे. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यादरम्यान रात्री ८.३० वाजेपासून गत उपविजेता क्राेएशिया व पाच वेळच्या विजेता ब्राझील या लॅटिन अमेरिका आणि युराेप खंडातील संघात सामना हाेणार आहे. त्यानंतर अर्जेंटिना- हाॅलंड सामना रंगणार आहे.
दिव्य मराठी एक्स्पर्ट अनादी बरुआ माजी खेळाडू व प्रशिक्षक अभिक चटर्जी ओडिशा एफसी संघाचे जीएम रजत रोज राष्ट्रीय फुटबाॅलपटू
मेसीच्या अर्जेेंटिना टीमचा डिफेन्स दुबळा, हाॅलंडला माेठी संधी; क्राेएशिया-ब्राझील सामना हाेणार अटीतटीचा अर्जेटिना आणि हाॅलंड यांच्यात रंगतदार सामना हाेण्याची शक्यता आहे. सध्या हाॅलंड टीमलाही तुल्यबळ मानले जात आहे. कारण, संघाकडे गेकपाे, डिपेसारखे थेट प्रतिस्पर्धीच्या डिफेन्सला भेदणारे आक्रमक खेळाडू आहेत. सध्या मेसी आपल्या अर्जेटिना टीमच्या दुबळ्या डिफेंन्समुळे काहीसा अडचणीत सापडला आहे. याच दुबळ्या डिफेन्सचा माेठा फायदा घेण्याची हाॅलंड टीमला संधी आहे. सध्या अर्जेटिना संघाच्या विजयाची मदार ही स्ट्रायकर आणि फाॅरवर्ड असणार आहे. यासाठी मेसी आणि मार्टिनेजला संघाच्या विजयासाठी दर्जेदार खेळी करावी लागणार आहे. ब्राझील आणि क्राेएशिया यांच्यात अटीतटीचा सामना हाेण्याचा अंदाज माजी फुटबाॅलपटू वर्तवत आहेत. सध्या दाेन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. क्राेएशियाने गत वर्षी फायनल खेळली आहे. त्यामुळे संघाने आता लांब पासेस आणि सामन्याला संथ करण्याच्या आपल्या शैलीदार खेळीचे डावपेच आखले आहेत.
ब्राझील Vs क्रोएशिया पाच वेळच्या ब्राझीलसमाेर गत उपविजेता क्राेएशिया संघ
पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाला यंदा किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. यासाठी हा मजबूत संघ ठरला आहे. मात्र, आता या संघाला अंतिम चारमधील स्थान निश्चित करण्यासाठी आज गत उपविजेत्या क्राेएशिया टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. क्राेएशिया संघाची यंदाच्या स्पर्धेतील लक्षवेधी ठरली. टीमने चारपैकी दाेन सामन्यांत विजयाची नाेंद केली. तसेच दाेन सामने बराेबरीत राेखले. या संघाचा कॅनडावरील ४-१ ने मिळवला माेठा विजय लक्षवेधी ठरला. आता या संघालाही विजयाचा दावेदार मानले जात आहे.
प्लेयर्स टू वाॅच { क्राेएशिया टीमचा कर्णधार माॅड्रिच सध्या सुमार खेळीने अडचणीत सापडला आहे. कुशल नेतृत्वात सरस ठरत असलेला हा खेळाडू मैदानावर खेळताना अपयशी ठरत आहे. {ब्राझील टीमचा नेमार हा प्रतिस्पर्धी क्राेएशिया संघाचे आव्हान परतावून लावण्यासाठी सक्षम मानला जाताे. त्याने ११ सामन्यात ८ गाेल आणि ७ असिस्ट केले आहे.
स्ट्रॅटेजी काॅर्नर {ब्राझील संघाने यंदा ४-२-३-१ या फाॅर्मेशनने खेळी करताना अंतिम आठचा पल्ला गाठला. {क्राेएशिया संघ ४-३-३ फाॅर्मेशनसह मैदानावर उतरण्याच्या तयारीमध्ये आहे.
कोच vs कोच { क्राेएशियाचे प्रशिक्षक ज्लाटकाे डालिच यांनी बलाढ्य ब्राझील संघाला पराभूत करण्यासाठी खास डावपेच आखले आहेत. {ब्राझीलचे काेच िटटे यांनी आक्रमक खेळी करण्याचा सल्ला दिला आहे. यातून क्राेएशियाच्या डिफेन्सला भेदून गाेल करता येणार आहेत.
हाॅलंड विरुध्द अर्जेंटिना हाॅलंड संघाला अर्जेंटिना टीमविरुद्ध विजयाची संधी लियाेनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिना टीमने आता फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी आता अर्जेटिना टीमचा अंतिम आठमधील सामना डचच्या हाॅलंड संघाशी हाेणार आहे. यादरम्यान हाॅलंड संघ २०१४ विश्वचषकातील फायनलमधील पराभवाची परतफेड अर्जेटिना करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या दाेन्ही संघांमध्ये काट्याची लढत रंगण्याची शक्यता आहे. १९९८ हाॅलंड संघाने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनावर मात केली हाेती. १९७८ विश्वचषकातील फायनलमध्ये अर्जेटिना टीमने हाॅलंडचा पराभव केला हाेता
प्लेयर्स टू वॉच { हाॅलंड संघाचा माेम्फिस डिपे सध्या ३४ सामन्यांपासून सरस खेळी करत आहे. यात त्याच्या नावे २४ गाेल नाेंद आहे. { अर्जेटिना संघाचा २२ वर्षीय ज्युलियन अल्वारेज चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत दाेन गाेल केले आहेत. त्यामुळे आताही सर्वाेत्तम खेळीसाठी उत्सुक आहे.
कोच vs कोच { हाॅलंड संघाचे प्रशिक्षक लुई वॅन गाल सध्या काऊंटर स्ट्रेटजी तयार करण्यावर भर देत आहेत. त्यांनी डिफेंन्सला मजबुत केले आहे. { अर्जेटिनाचे काेच लियाेनेल स्कालाेनीने पुन्हा विजयाचा कित्ता गिरवण्यासाठी मजबूत असे डावपेच आखले आहेत.
स्ट्रॅटेजी काॅर्नर {हाॅलंड संघ आता नव्या ३-४-१-२ च्या फाॅर्मेशनने मैदानावर उतरण्याच्या तयारीत आहे. {अर्जेटिना संघाने आपला फाॅर्मेशन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाला विजयाची आशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.