आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वित्झर्लंडची वाट खडतर; पाेर्तुगालची नजर उपांत्यपूर्व फेरीवर:आज स्वित्झर्लंड वि. पाेर्तुगाल सामना; विजेत्याची आगेकूच

दाेहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेल्या क्रिस्टियानाे राेनाल्डाेचा पाेर्तुगाल संघ फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. याची संधीही संघाला आहे. पाेर्तुगालचा प्री-क्वार्टर फायनल सामना आज मंगळवारी स्वित्झर्लंड टीमशी हाेणार आहे. या सामन्यात पाेर्तुगाल संघाचे विजयासाठीचे पारडे जड मानले जात आहे. पाेर्तुगाल संघाला गत सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, सुरुवातीच्या सामन्यातील सर्वाेत्तम खेळीमुळे टीमला बाद फेरी गाठता आली. स्वित्झर्लंड संघाने गटातील तीन सामन्यांत दाेन विजय संपादन केले. टीमला एका सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलने धूळ चारली हाेती. सध्या संघाचा गाेलरक्षक फिटनेसमुळे अडचणीत सापडला आहे. या संघाने आतापर्यंतच्या तीन सामन्यांदरम्यान दाेन गाेलरक्षकांना संधी दिली.

आंतरराष्ट्रीय सामन्यात पाेर्तुगाल: ९, स्वित्झर्लंड - 11 दाेन्ही संघांचे ५ सामने ड्राॅ विश्वचषकात सामने पाेर्तुगाल: 4 स्वित्झर्लंड: 3 दाेन्ही संघांचे २ सामने ड्राॅ

प्लेअर्स टू वॉच पाेर्तुगाल: क्रिस्टियानाे राेनाल्डाेकडे पाेर्तुगाल संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तसेच त्यालाही सर्वाेत्तम कामगिरीतून कमबॅक करावे लागणार आहे. त्याच्या नावे तीन सामन्यांत एकच गाेल नाेंद आहे.

स्वित्झर्लंड: अल्पाइन मेसी नावाने आेळखल्या जाणाऱ्या शकिरीवर विजयाची मदार असेल. त्याच्यासाेबतीला एमबाेलाेही आहे. हे दाेघेही पाेर्तुगालसाठी अडचणीचे ठरू शकतील.

स्वित्झर्लंड कोच vs पोर्तुगाल कोच {स्वित्झर्लंडचे काेच मुरत याकिन यांनी विजयाचे संकेत दिले. ‘आम्ही पाेर्तुगाल टीमला पराभूत करण्यासाठी उत्सुक आहाेत. टीमने यासाठी कसून तयारी केली आहे. {प्रशिक्षक फर्नांडाे सँटाेस यांनी पाेर्तुगालच्या दणदणीत विजयासाठी खास डावपेच आखले आहेत. त्यामुळे टीमचा विजयाचा दावा मजबूूत आहे.

दोन्ही संघांचे डावपेच राहणार कायम {स्वित्झर्लंड संघाने गत तीन सामन्यांत ४-२-३-१ फाॅर्मेशनने खेळी करत दाेन विजय साजरे केले. आता याच फाॅर्मेशनने टीम पाेर्तुगालचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी उत्सुक आहे. {पाेर्तुगाल संघाने ४-३-३ फाॅर्मेशनच्या बळावर सर्वाेत्तम खेळी केली. आताही याच फाॅर्मेशनचा वापर करण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...