आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokiyo Olimpics This Year, American Women Have Won Three More Medals Than Men

टोकियाे ऑलिम्पिक:यंदा नारीशक्तीचे वर्चस्व, अमेरिकी महिलांनी पुरुषांपेक्षा तिप्पट पदके जिंकली, चिनी महिलांनी दुप्पट

टोकियाे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 पदके जिंकणारी: एकमेव ऑस्ट्रेलियाची एमा

ऑलिम्पिकमध्ये महिला व पुरुषांसाठी पदकांचे क्रीडाप्रकार समान असतात. परंतु, पदकतालिकेत टॉप-५ देशांत महिलांची पदके पुरुषांपेक्षा ६७% अधिक आहेत. या ५ देशांतील महिलांनी आतापर्यंत एकूण १९४ पदके तर पुरुषांनी ११६ पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत अव्वल चीनच्या महिलांनी चिनी पुरुषांच्या तुलनेत दुप्पट तर तिसऱ्या स्थानावरील अमेरिकी महिलांनी पुरुषांपेक्षा तिप्पट पदके पटकावली आहेत. हाच कल जपान, रशिया व ऑस्ट्रेलियाचा आहे. आतापर्यंतची पदके पाहता हे स्पष्ट आहे की अमेरिका व चिनी महिलांनी पुरुषांइतकी पदके जिंकली असती तर हे दोन देश पदकतालिकेत रशिया व ऑस्ट्रेलियाच्या मागे असते. ज्या देशांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले त्यात पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर आहेत. भारताने आतापर्यंत एक रौप्य जिंकले आहे. आणखी एक पदक निश्चित आहे. ही पदके महिलांनाच (मीरा-लवलिना) मिळणार आहेत.

अश्वारोहण पुरुषांचा खेळ, यातही महिलाची आघाडी
ऑलिम्पिकमध्ये अश्वारोहण स्पर्धा खुल्या श्रेणीतही असते. यात महिला किंवा पुरुष भाग घेऊ शकतात. खुल्या श्रेणीत आतापर्यंत एकूण १२ स्पर्धा झाल्या आहेत. यात १० पदके महिलांनी जिंकली, तर पुरुषांनी फक्त २ पदके जिंकली आहेत.

बातम्या आणखी आहेत...