आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक:बॉक्सर लवलिनाची तैवानच्या माजी विश्वविजेतीला हरवून सेमीफायनलमध्ये धडक, भारताचे दुसरे पदक पक्के

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता वर्ल्ड चम्पियन तुर्कीच्या बॉक्सरशी लढत, दोन विजयांच्या अंतरावर सुवर्ण

भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेन ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली. तिने २०१८ ची विश्वविजेती तैवानच्या चेन निएनला ४-१ ने नमवले. भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले. लवलिना पदक जिंकणारी तिसरी बॉक्सर ठरेल. मेरी कोम व विजेंदरने ही कामगिरी केली होती. विजयानंतर दै. भास्करकडे लवलिना म्हणाली, ‘मी दबावात आले नाही. अन्यथा पूर्ण सामर्थ्याने उतरू शकले नसते. आता सुवर्ण जिंकायचेच आहे. एकच सुवर्णपदक असते.’

‘माझ्याकडे कांस्य व रौप्यपदके खूप आहेत, आता फक्त सुवर्णच हवे...’
लवलिना म्हणाली, ‘ऑलिम्पिक पदक निश्चित झालंय, मात्र इतकेच माझे ध्येय नाही. सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न आहे. माझ्याकडे कांस्य व राैप्यपदके खूप आहेत, सुवर्ण नाही. बाबा मला म्हणाले, मी मेरी कोमला रडताना पाहिले आहे. तू असे कौशल्य दाखव की ज्युरींच्या मनात शंकाच राहू नये. मनात हीच खूणगाठ बांधली. नैसर्गिक खेळ केला...’ (शब्दांकन : दैनिक भास्करचे गौरव मारवाह आणि अनिल बन्सल.)

लवलिना ४ ऑगस्टला बुसेनाज सुरमेनेलीविरुद्ध लढेल. तुर्कीची बुसेनाज २०१९ ची विश्वविजेती बॉक्सर आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमधील दोन्ही लढती ५-० ने जिंकल्या आहेत. कारकीर्दीत २१ पैकी १६ लढती जिंकल्या आहेत.

शाब्बास शटलर : सिंधू सेमीत जिंकली तर पदक पक्के
बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने शुक्रवारी क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या अकाने यामागुचीला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सिंधूने पाचवी मानांकित खेळाडू यामागुचीला ५६ मिनिटांत २१-१३, २२-२० ने नमवले. सिंधू सलग दोन सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू आहे. आता तिची लढत शनिवारी तैवानच्या ताई जू यिंगविरुद्ध होईल. सिंधू अग्रमानांकित ताई जूविरुद्ध १३ सामन्यांत पराभूत झालेली आहे.

महिला हॉकी : आयर्लंडला हरवले. शनिवारी द. आफ्रिकेला नमवले व आयर्लंड पराभूत झाल्यास भारत पहिल्यांदाच नॉकआऊटमध्ये पाेहोचेल.

पुरुष हॉकी : अंतिम ग्रुप लढतीत यजमान जपानला ५-३ ने हरवले. रविवारी नेदरलँड, ब्रिटन वा जर्मनीपैकी एका संघाविरुद्ध उपांत्यपूर्वी फेरीचा मुकाबला होईल.

विजयानंतर दै. भास्करकडे म्हणाली-
जेव्हा आपण भीतीवर मात करतो, तेव्हाच पदक जिंकू शकतो...

बातम्या आणखी आहेत...