आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो ऑलिम्पिक:भारतीय पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमने 5-2 ने पराभव केला, आता ब्राँझ पदकासाठी खेळणार

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला आहे. गतविजेता संघ बेल्जियमने भारताचा 5-2 असा पराभव केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. या सामन्यात भारत एका टप्प्यावर 2-1 ने आघाडीवर होता. यानंतर बेल्जियमने आणखी चार गोल केले. बेल्जियमने चौथ्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले. मागील काही वर्षांत भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमचा सामना करणे कठीण झाले आहे. बेल्जियमने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा 3-0 आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 3-1चा पराभव केला होता. लंडनमध्ये, दोन्ही संघ पूल टप्प्यात आमनेसामने आले होते. रिओमध्ये दोन्ही संघाचा क्वार्टर फायनलमध्ये सामना झाला होता.

आता कांस्यपदकासाठी भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीत पराभूत संघाशी होईल. जर भारतीय संघाने तो सामना जिंकला, तर 41 वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिक पदक मिळेल.

बातम्या आणखी आहेत...