आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympic Indian Boxer Lavlina Loses To World Number One Busenaz Surmeli

लवलिना बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत पराभूत:जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बुसेनाज सुरमेलीकडून भारतीय बॉक्सर पराभूत, परंतु कांस्यपदक घेऊन देशात परतणार

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर लवलिना उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेता तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेलीकडून पराभूत झाली आहे. लवलिना पराभूत झाली, पण तिने आपल्या खेळाने भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा इतिहास लिहिला आहे. ती कांस्यपदकासह भारतात परत येईल.

लवलिना हा सामना जिंकली असती तर ती ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली बॉक्सर बनली असती. ऑलिम्पिक भारतीय बॉक्सर्सच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची तिने बरोबरी केली आहे. विजेंदर सिंग (2008 मध्ये) आणि एमसी मेरी कॉम (2012 मध्ये) उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे.

बुसेनाझशी होता पहिलाच सामना
लवलिना आणि बुसेनाझ दरम्यान आतापर्यंत कोणतीही लढत झाली नव्हती. त्यांच्यातील पहिली लढत बुधवारी झाली. बुसेनाझने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ॲना लिसेन्कोचा 5-0 असा पराभव केला होता. लोवलिनाने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चिन चेनचा पराभव केला होता. चेन माजी विश्वविजेता देखील आहे. विशेष गोष्ट अशी की, ऑलिम्पिकपूर्वी लवलिना चेनविरुद्ध चार सामन्यात पराभूत झाली होती.

बातम्या आणखी आहेत...