ऑलिम्पिक पुढील वर्षी उन्हाळ्यापूर्वी होऊ शकते, टोकियो स्पर्धेसाठी सर्व पर्याय खुले : आयओसी

  • टोकियो स्पर्धेचा पॅरिस 2024 वर परिणाम नाही

वृत्तसंस्था

Mar 26,2020 10:41:00 AM IST

लुसाने/टोकियो - टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखेसाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ही स्पर्धा पुढील वर्षी २०२१ मध्ये होऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी म्हटले. बुधवारी कॉन्फरन्स कॉलवर चर्चा केली आणि म्हटले, “हा खेळ केवळ उन्हाळ्याच्या एक महिन्यासाठी मर्यादित नाही. उन्हाळ्यापूर्वीही होऊ शकतो.’ आयओसीने मंगळवारी स्पर्धा पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलली आहे. यादरम्यान अॅथलेटिक्स व जलतरण जागतिक संघटना टाेकियो ऑलिम्पिकसाठी आपापल्या जागतिक स्पर्धेमध्ये बदल करण्यास तयार आहे. दुसरीकडे, पॅरिस ऑलिम्पिक २०१४ च्या आयोजकांनी म्हटले की, टोकियो ऑलिम्पिकचा परिणाम पॅरिस स्पर्धेवर होणार नाही. ती आपल्या निर्धारित वेळेतच होईल.


ऑलिम्पिकचे काउंटडाऊन घड्याळ बंद : जपानच्या ऑलिम्पिक टास्क फोर्सने स्पर्धेच्या नविन आयोजनासाठी तयारी सुरु केली आहे. आयोजकांनी टोकिओ ऑलिम्पिकचे काउंडाडन घड्याळ बंद केले. ते ऑलिम्पिक कधी सुरु होईल हे दाखवत होते. यादरम्यान, ऑलिम्पिक ज्योत रॅली पुढे ढकलली, फुकुशिमामध्ये राहिल.

X