आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. ऑलिम्पिक सुरू होण्यास 5 दिवस बाकी आहेत. परंतु, क्रीडाग्राममध्ये दोन खेळाडू आणि बाहेरील देशातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले आहे. 5 दिवसांपूर्वी खुल्या झालेल्या क्रीडाग्राममध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले आहे. स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये तयारीमध्ये गुंतलेल्या अधिका्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
संक्रमित अधिकाऱ्याला आयोजकांनी 14 दिवस क्वारंटाईन केले आहे. दोन दिवसांपूर्वी जपानमध्ये एक खेळाडू आणि पाच कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. यासोबतच ज्या हॉटेलमध्ये ब्राझीलची ज्युडो टीम राहात आहे त्या हॉटेलमधील आठ कर्मचार्यांच्या संसर्गाची लागणे झाल्याचे आढळून आले होते.
पाच दिवसांपूर्वी खेळाडूंसाठी खुले करण्यात आले होते क्रीडाग्राम
ऑलिम्पिक सुरु व्हायला 5 दिवसांचा अवधी उरलेला आहे. क्रीडाग्राममध्ये खेळाडूंसाटी 5 दिवसांपूर्वीच हे खुले करण्यात आले होते. ऑलिम्पिक दरम्यान क्रीडाग्राममध्ये सुमारे 11,000 अॅथलिट आणि हजारो इतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.
22 ऑगस्टपर्यंत टोकियोमध्ये कडक निर्बंध
जपानमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. शुक्रवारी 3418 प्रकरणे आढळून आली आणि 24 लोकांचा मृत्यू. टोकियोमध्ये आपत्कालीन स्थिती 22 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या दरम्यान रात्री 8 वाजेपर्यंत उद्याने, हॉटेल, रेस्टॉरंट्स, थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सार्वजनिकरीत्या एकत्र येण्यावर बंदी
लॉकडाऊन लावण्याचा मुख्य उद्देश आहे, नागरिकांनी घरीच बसून टीव्हीवर ऑलिम्पिक पाहावे. सार्वजनिकरीत्या एकत्र येण्यावर बंदी असेल. स्टेडियममध्ये चाहते येणार नसल्याने ऑलिम्पिकवर निश्चित परिणाम होईल. टोकियोत नागरिकांना कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.