आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics 2021 Mirabai Chanu Wins First Medal For India, Wins Silver In Weightlifting

टोकियो ऑलिम्पिक:मीराबाई चानूने भारताला मिळवून दिले पहिले पदक, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले, नेमबाज सौरभ चौधरी अंतिम फेरीत पोहोचला

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या हौ झीहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.

दुसरीकडे भारतीय नेमबाज सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सहाव्या मालिकेच्या पात्रता फेरीत सौरभने 600 पैकी 586 गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले. या इव्हेंटमध्ये आणखी एक भारतीय नेमबाज अभिषेक पात्रता फेरीतच बाद झाला. 575 गुणांसह तो 17 व्या स्थानावर राहिला. पात्रता फेरीमध्ये टॉप-8 क्रमांकाच्या नेमबाजला अंतिम सामन्यात स्थान मिळते.

पुरुषांच्या हॉकीमध्ये भारताने न्यूझीलंडला 3-2 ने हरवून दमदार सुरुवात केली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांची जोडी तिरंदाजी मिक्स्ड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. त्याच वेळी नेमबाजीच्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताची एलाव्हनिल वॅलारीवान आणि अपूर्वी चंदेला अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. ज्युडोमध्ये भारताच्या सुशीला देवीला पराभवाला सामोरे जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...